महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 20025 : आयपीएल 2025 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला जाणार आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर गायकवाडच्या जागी महेंद्रसिंग धोनी संघाची धुरा सांभाळणार असल्याचे बोलेल जात असतानाच सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजचा सामना शेवटचा असल्याचे बोलले जात आहे. अचानक या सामन्यात धोनी कर्णधार होणार असल्याच्या चर्चेने त्याच्या निवृत्तीबाबत उलट सुलट चर्चा रंगायला सुरवात झाली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बाब मानली जात आहे.
मैदनावर नेहमी कूल राहणारा आणि कप्तान कुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा धोनी गेल्या हंगामात गुडघ्याच्या दुखापतीसह खेळताना दिसून आला.तो आईस पॅड वापरुन मैदानात सराव करत असे. त्याला धावा करण्यात अडचण येत होती. या हंगामात देखील धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना दिसतो. अशा परिस्थितीत धोनी आपल्या शरीराची प्रकृती लक्षात घेऊन निवृत्तीचा विचार करू शकतो.
हेही वाचा : LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग..
या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी काही दिवसांपूर्वी धोनीच्या फिटनेसबाबत मोठे विधान केले होते. धोनी आधी सारखा तंदरूस्त नाही. असे फ्लेमिंगने म्हटले होते. या कारणास्तव, धोनीच्या फलंदाजीच्या क्रमात सामन्याच्या परिस्थितीनुसार बदल करण्यात येतो. घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलला होता. ज्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती.
आयपीएलमध्ये धोनीचा नेहमी दबदबा राहिला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 267 सामने खेळले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने एकूण पाच वेळा विजेतेपद आपल्या नावे केले आहे. आयपीएल मधील त्याची फलंदाजी बघितली तर त्याने 39.13 च्या सरासरीने 5289 धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने 24 अर्धशतकेही केली आहे. तसेच धोनीचे विकेटकीपिंगही जबरदस्त राहिले आहे. त्याने 44 स्टंपिंग आणि 152 झेल देखील घेतले आहेत.
हेही वाचा : LSG vs MI : एलएसजीविरुद्ध तिलक वर्मा रिटायर्ड आउट; आयपीएलच्या इतिहासात ठरला चौथा फलंदाज..
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने आपल्या संघाला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. धोनीची गणना सर्वोत्तम फिनिशर म्हणून करण्यात येते. हे त्याने खूप वेळा सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर तीन मोठे विक्रम आहेत जे क्वचितच मोडले जाण्याच्या शक्यता आहे. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 226 सामन्यांमध्ये सामन्याचे नेतृत्व केले आहे. धोनीने 2023 मध्ये चेन्नईला शेवटचे चॅम्पियन बनवले आहे. आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकणारा तो सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.