Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट पद्धत सुरू केली आहे. आयपीएल आणि टीम इंडियात संधी न मिळालेल्या खेळाडूंना 20 लाखांपर्यंत मानधन मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 16, 2026 | 08:55 PM
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट'ची घोषणा (Photo Credit- X)

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी 'सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट'ची घोषणा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय!
  • खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा
  • देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
MCA Central Contract: आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. अनेक युवा खेळाडू या व्यासपीठावर आपली चमक दाखवत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस हा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक सुरू होईल. मात्र, भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये स्थान मिळवणे हे मोजक्याच खेळाडूंना शक्य होते. अशा स्थितीत, ज्या खेळाडूंना या दोन्ही मोठ्या व्यासपीठांवर संधी मिळत नाही, त्यांच्या उपजीविकेचे आणि कमाईचे काय? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे दिले आहे.

‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा

देशातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघटना असलेल्या ‘एमसीए’ने आपल्या खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट (Central Contract) देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आगामी 2026-27 या हंगामापासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) धर्तीवरच एमसीए आपल्या खेळाडूंना 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणार असून, त्यानुसार त्यांना ठराविक वार्षिक रक्कम दिली जाणार आहे.

कंत्राटासाठी ‘या’ आहेत महत्त्वाच्या अटी

एमसीएच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, हे कंत्राट सर्वच खेळाडूंना मिळणार नाही. यासाठी काही विशेष निकष लावण्यात आले आहेत. खेळाडू एमसीएचा नोंदणीकृत खेळाडू असणे अनिवार्य आहे. जे खेळाडू सलग 2 हंगामांपासून भारतीय संघात निवडले गेलेले नाहीत किंवा ज्यांना सलग 2 आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतलेले नाही, अशाच खेळाडूंना या कंत्राटाचा लाभ मिळेल. ज्या खेळाडूंना आयपीएल किंवा टीम इंडियाकडून उत्पन्न मिळत नाही, त्यांना आर्थिक स्थैर्य देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. निवड समितीची शिफारस आणि एमसीएने ठरवून दिलेले फिटनेसचे कडक निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंनाच या यादीत स्थान मिळेल.

Arshdeep Singh Milestone: अर्शदीप सिंहचा IPL मध्ये ‘शंभरी’ धमाका! पंजाब किंग्ससाठी इतिहास रचणारा ठरला पहिलाच गोलंदाज

वार्षिक मानधनाचे स्वरूप आणि श्रेणी

बीसीसीआयप्रमाणेच एमसीएने देखील तीन श्रेणी निश्चित केल्या असून त्यातील मानधन पुढीलप्रमाणे असेल:

1. ग्रेड A: या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 12 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळेल.

2. ग्रेड B: या खेळाडूंना वर्षाला 8 लाख ते 12 लाख रुपये दिले जातील.

3. ग्रेड C: या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 8 लाख रुपये निश्चित मानधन मिळेल.

महत्त्वाची टीप: हे वार्षिक कंत्राट खेळाडूंना मिळणाऱ्या ‘मॅच फी’पेक्षा वेगळे असेल. म्हणजेच रणजी ट्रॉफी, विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांसारख्या स्पर्धा खेळल्यानंतर मिळणारे सामन्याचे मानधन खेळाडूंना स्वतंत्रपणे मिळत राहील.

देशातील पहिलीच संघटना

अशा प्रकारे स्थानिक खेळाडूंसाठी वार्षिक कंत्राट पद्धत लागू करणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही देशातील पहिलीच राज्य संघटना ठरली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या क्रिकेटपटूंना केवळ आर्थिक सुरक्षाच मिळणार नाही, तर त्यांच्या कामगिरीत अधिक सातत्य आणि व्यावसायिकता येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक काय म्हणाले?

MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले, “हा उपक्रम मुंबई क्रिकेटसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे. आपल्या खेळाडूंसाठी करार पद्धती लागू करणारी पहिली संघटना ठरल्याचा आम्हाला अभिमान आहे. हे एक पुरोगामी पाऊल आहे, जे आमच्या मुंबईच्या खेळाडूंना अधिक सुरक्षा, सुसूत्रता आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देईल. हे पाऊल मुंबई क्रिकेटचा पाया मजबूत करण्याच्या आणि क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला सक्षम करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.”

MCA ने पुढे म्हटले, “हा उपक्रम उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आर्थिक सुरक्षा, व्यावसायिक कार्यचौकट आणि दीर्घकालीन विकासाचे मार्ग उपलब्ध करून देत एका नव्या युगाची नांदी ठरतो. ही प्रणाली अशा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जे उच्च सन्मान किंवा यशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत; ज्यामुळे त्यांना देशांतर्गत स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी आवश्यक ते स्थैर्य आणि प्रेरणा मिळेल.”

अबब! CSK च्या गोटात उडाली खळबळ; ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL मधून बाहेर; कारण काय?

Web Title: Mumbai cricket association launches annual contracts for domestic players 2026 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:55 PM

Topics:  

  • bcci
  • cricket news
  • IPL 2026
  • MCA

संबंधित बातम्या

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
1

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
2

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
3

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
4

Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.