IND vs NZ Final : या पाकिस्तानचं करायचं काय? 'गावस्कर शारजातून पळाले', इंझमाम उल हक बरळला..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs NZ Final : टीम इंडियाने 12 वर्षाच्या एका तपानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयानंतर भारतामध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानमध्ये दुख:चा डोंगर कोसळल्याप्रमाणे स्थिति असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता या स्पर्धेनंतर इंझमाम उल हक संतापला असल्याचे दिसून आले आहे. त्याने सुनील गावसकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की ‘एकदा गावस्करकडून पाकिस्तानातून पळून जाण्यासाठी शारजाहून पळून जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.’
हेही वाचा : Champion Trophy 2025 :टीम इंडियाच्या विजयाने पाकिस्तानवर शोककळा; ‘विजेता आधीच ठरलेला’; आफ्रिदीची आगपाखड…
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू इंझमाम-उल-हक याने अलीकडेच भारतीय क्रिकेट महान सुनील गावस्कर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंझमाम म्हणाला की, ‘भारताने सामना जिंकला, ते चांगले खेळले आहेत, पण मिस्टर गावस्कर यांनीही एकदा आकडेवारी पहावी. पाकिस्तानविरुद्ध खेळायला लागू नये म्हणून त्यांनी एकदा शारजाहून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. ते आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आमचे ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण देशाबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या संघाचे हवे तेवढे कौतुक करू शकता, पण इतर संघांवर अशा कमेंट करणे योग्य नाही.’ असे इंझमाम म्हणाला.
हेही वाचा : जगातील आठवं आश्चर्य! आणि गौतम गंभीर हसत हसत नाचला; नवज्योत सिंह सिद्धूने करून दाखवलं…Video Viral
इंझमाम पुढे म्हणाला की, ‘त्यांनी एकदा आकडे बघावेत, त्यांना कळेल की पाकिस्तान नेमका कुठे आहे. त्यांनी असे विधान केल्याने मला खूप वाईट वाटले आहे. ते एक महान आणि आदरणीय क्रिकेटपटू आहेत, पण अशा कमेंट करून ते आपल्या चांगल्या वारशाची हानी करून घेत आहेत. त्यांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवायला हवा.’
गावस्कार म्हणाले होते की, ‘भारताची ब टीम देखील पाकिस्तानला आव्हान देऊ शकते.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की भारताची ब टीम पाकिस्तानला नक्कीच अडचणीत आणू शकते. मला क संघाबाबत काही खात्री नाही, पण सध्याच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानला पराभूत करणे ब संघासाठी खूप कठीण जाणार आहे.
भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.