न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
T20 Tri-series : झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० तिरंगी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघाचा सहभाग आहे. या मालिकेची न्यूझीलंडने विजयाने सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडने आपले खाते उघडले आहे. आता तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एक सामना आपल्या नावावर केला आहे.त्याच वेळी, झिम्बाब्वेला अद्याप या मालिकेत विजय मिळवता आलेला नाही.
हरारे येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सुरुवात वाईट झाली. टिम सेफर्ट २२ धावा केल्यानंतर २७ धावांवर तो माघारी परतला. त्याच वेळी, डेव्हॉन कॉनवे ९ धावा करून बाद झाला. संघाला ३५ धावांवर दुसरा धक्का बसला. त्यानंतर डॅरिल मिशेल देखील ६२ धावांच्या स्कोरवर आउट झाला. तो ५ धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर जिमी नीशम लगेच बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने ७० धावांवर आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या.
हेही वाचा : Eng vs Ind : करुण नायर चौथ्या कसोटीत दिसणार का? की बेंचवर बसणार?संघ व्यस्थापनासमोर ‘हे’ आहेत पर्याय
टिम रॉबिन्सनने एका टोकाला धरून फलंदाजी केली. सहाव्या विकेटसाठी टिमला बेवन जेकब्सची चांगली साथ मिळाली. रॉबिन्सनने शानदार खेळी करत ७५ धावा केल्या. बेवनने महत्वपूर्ण ४४ धावांची नाबाद खेळी करत संघाला ५ विकेट गमावून १७३ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून क्वेना म्फाकाने २, लुंगी न्गिडीने १, कॉर्बिन बॉशने १ आणि सेनुरन मुथुसामीने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल, लक्ष्याचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ १५२ धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात देखील खराब झाली. त्यांनी ६२ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. लुआन ड्रे प्रिटोरियसने २७ आणि रीझा हेंड्रिक्सने १६ धावा केल्या. त्याशिवाय रुबिन हरमनने १, सेनुरन मुथुसामीने ७ आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने ६ धावा केल्या. त्यानंतर देवाल्ड ब्रेव्हिस आणि जॉर्ज लिंडे यांनी थोडी भागीदारी केली. पण ब्रेव्हिस बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकला.
हेही वाचा : ICC Annual General Meeting! कसोटी आणि टी-२० क्रिकेटवर चर्चा होण्याची शक्यता; मिळाले ‘हे’ संकेत
देवाल्ड ब्रेव्हिसने ३५ धावा काढल्या. त्याशिवाय जॉर्ज लिंडेने ३० आणि जेराल्ड कोएत्झीने १७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि जेकब डफीने यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. दोघांनीही दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीचे धक्के दिले. त्यानंतर इश सोधीने २ आणि मिचेल सँटनरने १ बळी घेतला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरी केल्याने न्यूझीलंडने हा सामना २१ धावांनी आपल्या खिशात टाकला.