करूण नायर(फोटो-सोशल मीडिया)
Eng vs Ind 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. अशातच आता भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागाल आहे. गेल्या तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. संघातील करुण नायर वगळता प्रत्येक खेळाडूने आपलं योगदान दिले आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात भारतीय संघात करुण नायरला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला या संधीचे सोने करता आले नाही. तब्बल आठ वर्षांनंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणाऱ्या करूण नायरची कामगिरी खूप निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आगामी म्हणजे 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटीमध्ये त्याला डच्चू देण्याची शक्यता आहे. याबाबत लावजरच निर्णय घेण्यात येईल.
हेही वाचा : ICC Annual General Meeting! कसोटी आणि टी-२० क्रिकेटवर चर्चा होण्याची शक्यता; मिळाले ‘हे’ संकेत
८ वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या करुण नायरने या मालिकेतील सहा डावांत अनुक्रमे 0, 20, 31, 26, 40 आणि 14 अशा धावा केल्या आहेत. या आकडेवारीकडे बघता संघ व्यवस्थापन त्याला पुढील सामन्यात संघात स्थान देण्यासाठी नक्कीच विचार करणार. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील टीम मॅनेजमेंट त्याच्या कामगिरीकडे कानाडोळा करून त्याला पुन्हा संधी देण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या जागी पहिल्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या युवा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता बोलली जात आहे.
करून नायर गेल्या दोन कसोटी सामन्यात नंबर 3 वर फलंदाजी करत आला आहे. नंबर ३ हा कसोटी क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा क्रमांक समजला जातो. सलामीवीर झटपट बाद झाल्यावर ३ नंबरच्या फलंदाजांवर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी असते. करून नायरला ही भूमिका पार पाडता आलेली नाही. त्याच्या लवकर आऊट होण्यामुळे मधल्या फळीवर अतिरिक्त ताण येत आहे. वरिष्ठ फलंदाज म्हणून त्याच्याकडून संघासह चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. परंतु, तो त्या पूर्ण करू शकला नाही. म्हणूनच, त्याच्या जागी साई सुदर्शनला मँचेस्टर कसोटीत त्याला अंतिम 11 मध्ये पुन्हा संधी मिळू शकते.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘आयसीसीने आकारलेला दंड मजेदार..’, डीएसपी सिराजच्या शिक्षेवर ‘या’ इंग्लिश दिग्गज खेळाडूचा संताप…
संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहसाठी ‘1-3-5’ असा फॉर्म्युला बनवला आहे. म्हणजेच, तो मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही. त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. आता प्रश्न निर्माण झाला आहे आहे कि, बुमराहच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल. हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीमध्ये प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी सुमार राहिली होती. म्हणूनच त्याला तिसऱ्या कसोटीत डच्चू देण्यात आला होता. दुसरीकडे, शार्दुल ठाकुरने पहिल्या कसोटीत भाग घेतला होता, मात्र त्याला केवळ 16 षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. आता चौथ्या कसोटीत संघाला एक गोलंदाजीसह फलंदाजीचा पर्याय हवा असल्यास शार्दुल ठाकूर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे संघ व्यवस्थापन ठाकूरला संधी देऊ शकतं.