न्यूझीलंडचा इंग्लंडवर विजय (फोटो- ट्विटर)
न्यूझीलंडने इंग्लंडवर 160 रन्सने विजय प्राप्त केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 438 रन्स केल्या. न्यूझीलंडच्या टॉम लेथमने शानदार शतक लगावले. दरम्यान या रन्सचा पाठलाग करताना इंग्लंड पहिल्या डावात केवळ 354 रन्स करू शकला. पहिल्या डावात न्यूझीलंडने इंग्लंडवर आघाडी घेतली होती.
A hard-fought series. A trophy heading home. The Crowe-Thorpe Trophy 🏆🤍🖤 pic.twitter.com/rtTcIkGYfR — BLACKCAPS (@BLACKCAPS) June 29, 2026
दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 288 रन्स केल्या. इंग्लंडसमोर मोठे टार्गेट असताना इंग्लंडचा संघ केवळ 212 रन्स करू शकली. जेमी स्मिथने 60 रन्सची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससाठी हा शेवटचा कसोटी सामना होतो. त्याने फलंदाजीत 30 रन्सची खेळी केली. न्यूझीलंडने इंग्लंडवर मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला डब्ल्यूटीसीच्या पॉईंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. न्यूझीलंडच्या विजयानंतर रँकिंगमध्ये थेट बदल झाला नाहीये. मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या पॉईंट्स टेबलमध्ये फरक पडला आहे. न्यूझीलंडचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
नाईटक्लब प्रकरणानंतर ECB ची कठोर भूमिका; बेन स्टोक्स-अॅटकिन्सन दुसऱ्या कसोटीतून बाहेर, जो रूटच्या हाती इंग्लंडची धुरा
बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सयाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे सध्या सुरू असलेला कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल; त्यानंतर बेन स्टोक्स मैदानावर खेळताना दिसणार नाही. स्टोक्सने २०११ मध्ये ‘व्हाइट-बॉल’ फॉरमॅटमधून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, डिसेंबर २०१३ मध्ये ॲशेस मालिकेदरम्यान ॲडलेड येथे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. एप्रिल २०२२ पासून स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे. २०१९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात, बेन स्टोक्सने ८४ धावांची शानदार नाबाद खेळी केली; या कामगिरीमुळे सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत पोहोचला आणि अखेरीस इंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेते बनले. त्याच वर्षी, हेडिंग्ले येथील ॲशेस कसोटी सामन्यात, त्याने नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंडला अनपेक्षित विजय मिळवून दिला.






