न्यूझीलंडचा झिम्बाब्वेला व्हाईटवॉश(फोटो-सोशल मीडिया)
New Zealand whitewash Zimbabwe: न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवेळी गेली आहे. या मालिकेतील दोन्ही सामने बुलावायो येथे खेळेल गेले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धचे दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडने झिम्बाब्वेला व्हाईटवॉश दिला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेला एक डाव आणि ३५९ धावांच्या मोठ्या फरकाने पछाडले आहे. या विजयासह न्यूझीलंडने कसोटी मालिका २-० अशी आपल्या खिशात घातली आहे. कसोटी क्रिकेटमधील हा झिम्बाब्वेचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
या कसोटी सामन्यात न्यूझीलंडसमोर झिम्बाब्वेचा संघ खूपच कमकुवत भासत होता. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्याच अंगलट आला. झिम्बाब्वे पहिल्या डावात संघ १२५ धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेकडून ब्रेंडन टेलरने सर्वाधिक ४४ धावा केल्या. बाकी इतर फलंदाज मैदानावर तग धूर शकले नाहीत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक ५ आणि झाचेरी फॉल्क्सने ४ बळी घेतले.
न्यूझीलंडच्या संघाने ३ गडी गमावून ६०१ धावांचा डोंगर रचून आपला पहिला डाव घोषित केला होता. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची शानदार भागीदारी रचली. यंगने १०१ चेंडूत ११ चौकारांसह ७४ धावा काढल्यानंतर तो माघारी परतला. त्यानंतर कॉनवे आणि जेकब डफी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. डफी ३६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कॉनवेसोबत हेन्री निकोल्सचिं जोड मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची दमदार भागीदारी ढकली आणि संघाची धावसंख्येत भर घातली.
कॉनवेने या दरम्यान त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक ठोकले. कॉनवेने २४५ चेंडूचा सामना करून १८ चौकारांसह १५३ धावा काढल्या. त्यांनतर तो बाद झाला. कॉनवेनेनंतर न्यूझीलंडने एकही विकेट गेली नाही. हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी मिळून २५६ धावांची भक्कम भागीदारी केली आणि संघाचा धावसंख्या ६०१ धावांवर नेऊन पोहचवली आणि डाव घोषित करण्यात आला. निकोल्सने २४५ चेंडूत १५० धावा तर रवींद्रने १३९ चेंडूत १६५ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडने झिम्बाब्वेवर ४७६ धावांची आघाडी मिळवली.
झिम्बाब्वे दुसऱ्या डावात ११७ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या झाचेरी फॉल्क्सने दुसऱ्या डावात ५ बळी टिपले. या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून ९ बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे झिम्बाब्वेने हा सामना एक डाव आणि ३५९ धावा असा गमावला. हा झिम्बाब्वेचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. तर न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधील आहे सर्वात मोठा विजय आहे.