(फोटो-instagram/istockphoto)
Fifa World Cup/Indian Food: सध्या फिफिया वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. अनेक रोमांचक सामने या स्पर्धेत चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. दरम्यान नॉर्वेचा संघ देखील चांगला खेळ करत आहे. नॉर्वेचा जबरदस्त खेळाडू आणि गोल्सचा पाऊस पाडण्यासाठी प्रसिद्ध असणारा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालैंड मैदानाबाहेर देखील चर्चेत आला आहे.
नुकतीच स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालैंडने एका मुलाखातीमध्ये भारतीय खाद्यसंस्कृतीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यामुळे भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात खुश झाले आहेत. स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालैंड मैदानावर आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र त्याला खाण्याची प्रचंड आवड आहे. तो खवय्या देखील आहे.
मैदानात डिफेंडर्सची झोप उडवणारा नॉर्वेचा हा स्टार स्ट्रायकर सध्या त्याच्या खाद्यप्रेमामुळे भारतातील सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. त्याला आवडीच्या खाद्यपदार्थांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा एर्लिंग हालैंडने मला भारतीय खाद्यपदार्थ खाण्यास खूप आवडतात. बटर चिकन, लँब चॉप्स हे दोन्ही पदार्थ माझे अत्यंत आवडीचे पदार्थ आहेत. त्यासोबत गरम गार्लिक नान असल्यास अजून मजा येते.
4 वेळा चँपियन जर्मनीला इक्वाडोरने चिरडले
इक्वेडोरने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा उलटफेर करत, फिफा विश्वचषक २०२६ च्या बाद फेरीमध्ये प्रवेश केला आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या गट ‘इ’ मधील एका रोमांचक सामन्यात, इक्वेडोरने चार वेळच्या विजेत्या जर्मनीला २-१ ने पराभूत केले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. देशाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करत, राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली.
या सामन्यापूर्वी, आयव्हरी कोस्टकडून १-० ने पराभव आणि कुराकाओविरुद्ध गोलशून्य बरोबरी झाल्यामुळे इक्वेडोरचा मार्ग अत्यंत कठीण मानला जात होता. बलाढ्य जर्मनीविरुद्ध संघाला कमी लेखले जात होते, परंतु मुख्य प्रशिक्षक सेबॅस्टियन बेकासे यांच्या मार्गदर्शनाखाली, खेळाडूंनी टीका आणि खराब फॉर्मच्या दबावावर मात करून मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली. सामन्याची सुरुवात जर्मनीच्या बाजूने झाली, जेव्हा फ्लोरियन विर्ट्झच्या पासवर लेरॉय सानेने एका उत्कृष्ट फिनिशने चेंडू जाळ्यात टाकला आणि जर्मनीला सुरुवातीलाच १-० अशी आघाडी मिळवून दिली.






