रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये कॅप्टन शांभवी पाठक यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली (फोटो - एक्स)
अजित पवार यांच्या आकस्मित मृत्यूनंतर देखील पवार कुटुंब हे समाजकार्यामध्ये उतरलेले दिसून आले. सुनेत्रा पवार यांनी अवघ्या चार दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या देखील बजेटसाठी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. त्याच रोहित पवार यांनी देखील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या इतर लोकांच्या घरी सांत्वनपर भेटी दिल्या आहेत. अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या घरी देखील रोहित पवार यांनी सांत्वनपर भेट दिली. यानंतर आता रोहित पवारांनी कॅप्टन शांभवी पाठक यांच्या घरी भेट दिली आहे.
हे देखील वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला शासकीय दौरा; साताऱ्यामध्ये घेणार जाधव कुटुंबाची भेट
आमदार रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पाठक कुटुंबाचे त्यांनी सात्वंन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. रोहित पवारांनी लिहिले आहे की, बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली. लष्कराची पार्श्वभूमी असलेले तिचे वडील आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या तिच्या आईचं दुःख हे अंत्यंत मोठं आहे. आपल्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न हे माता-पिता बघत असताना ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात एका कर्तृत्ववान मुलीचा बळी गेला. अशा परिस्थितीत त्या मातापित्याचं दुःख शब्दापलीकडचं आहे. त्यांना भेटून आणि त्यांच्याशी बोलून धीर दिला आणि शांभवीला श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखाप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
बारामतीतील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुण सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन विचारपूस केली. लष्कराची पार्श्वभूमी असलेले तिचे वडील आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या तिच्या आईचं दुःख हे अंत्यंत मोठं आहे.… pic.twitter.com/UiFCt4nk7B — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2026
हे देखील वाचा : दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का….? संजय राऊतांचा गंभीर सवाल
सुनेत्रा पवार घेणार विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा हा साताऱ्याला असणार आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये 10 वाजता कराड येथे सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेतले आहे. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले आहेत.






