डेव्हॉन कॉनवेचा मोठा धामका(फोटो-सोशल मीडिया)
NZ vs WI : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात डेव्हॉन कॉनवेने इतिहास घडवला आहे. डेव्हॉन कॉनवे एकाच कसोटीत दुहेरी शतक आणि शतक ठोकून मोठा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा कॉनवे न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. पहिल्या डावात दुहेरी शतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकून त्याने जा मोठा टप्पा गाठला आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ची कहाणी, अॅशेस मालिका जिंकून 10 वर्षांचा दबदबा ठेवला कायम
बे ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असेलल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात डेव्हॉन कॉनवेने दुहेरी शतक झळकवले. कॉनवेने ३६७ चेंडूत २२७ धावा केल्या. यामध्ये त्याने ३१ चौकार लगावले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरेच द्विशतक ठरले. तर दुसऱ्या डावात डेव्हॉन कॉनवेने १३९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकार मारून १०० धावा फटकावल्या. डेव्हॉन कॉनवे कसोटी सामन्याच्या एकाच डावात दुहेरी शतक आणि शतक ठोकणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
दरम्यान, टॉम लॅथमने देखील या कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावली आहेत. दोन्ही डावात शतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा सातवा फलंदाज ठरला आहे. लॅथमने पहिल्या डावात १३७ आणि दुसऱ्या डावात १०१ धावांची खेळी केली आहे. डेव्हॉन कॉनवे देखील आता या यादीत समावेश झाला आहे.
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावल्यानंतर जीएम टर्नर (१९७४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध), जीपी हॉवर्थ (१९७८ मध्ये इंग्लंडविरुद्ध), एएच जोन्स (१९९१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध), पीटर फुल्टन (२०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध), केन विल्यमसन (२०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध), यांच्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम (२०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध) हे शतके झळकावली आहेत.
या कसोटीच्या पहिल्या डावात डेव्हॉन कॉनवे आणि लॅथम यांनी पहिल्या विकेटसाठी ३२३ धावांची महाभागीदारी करून इतिहासरचला आहे. ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे. कॉनवे आणि लॅथम यांनी भारताच्या रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहित आणि मयंक यांनी २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली होती.






