फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ साठी सर्व क्रिकेट संघाची लढत सुरु आहे. सध्या पाहायला गेलं तर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत ९ संघ सहभागी आहेत. यामध्ये भारताचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. भारताच्या संघाने आतापर्यत ११ सामने खेळले आहेत त्यामध्ये ८ सामने जिंकले आहेत, तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ सामना अनिर्णयीत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे त्यांनी १२ सामने खेळले आहेत, यामध्ये ते ८ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी झाले आहेत तर ३ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एक सामना ड्रॉ झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या शर्यतीत पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर संघ यादीमध्ये सर्वात तळाला आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे यामध्ये पाकिस्तानच्या संघाला निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ४७ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंग पावल्याचे दिसत आहे. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
WTC POINTS TABLE…!!! 🇮🇳
– Pakistan slips to the last position now! pic.twitter.com/wSUshHYrxT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाकिस्तानने सामना अनिर्णित ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण सलमान आगा आणि आमेर जमाल या जोडीला या कामगिरीत यश मिळू शकले नाही. शुक्रवारी शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी चार विकेट्सची गरज होती आणि जॅक लीचने यापैकी तीन विकेट घेत पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने दुस-या डावात केवळ नऊ विकेट गमावल्या कारण अबरार अहमद आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होता आणि त्यामुळे फलंदाजीसाठी बाहेर येऊ शकला नाही.