Indian Hockey Team In Semifinal : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. जिथे भारतीय हॉकी संघाचा सामना जर्मन संघाशी होणार आहे. मात्र, याआधीच हॉकी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय हॉकीपटू अमित रोहिदासवर उपांत्य फेरीपूर्वी एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.
भारतीय गोलकिपर श्रीजेशची धमाकेदार कामगिरी
🇮🇳🔥 𝗕𝗘𝗔𝗧 𝗠𝗘 𝗜𝗙 𝗬𝗢𝗨 𝗖𝗔𝗡! Describe PR Sreejesh's performance at #Paris2024 in one word in the comments below. ⤵
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀… pic.twitter.com/4a650vEAyD
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 4, 2024
ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात मिळाले रेड कार्ड
भारतीय खेळाडू अमित रोहिदासला ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रेड कार्ड दाखवण्यात आले, त्यानंतर भारतीय संघाला उर्वरित सामन्यात 10 खेळाडूंसह खेळावे लागले. ब्रिटनविरुद्धचा चेंडू अमित रोहिदास पुढे सरकत होता. त्यानंतर त्याची काठी चुकून विल कॅलननच्या चेहऱ्यावर लागली. ज्यावर रेफरीने त्याला रेड कार्ड दाखवले.
अमित रोहिदास उपांत्य फेरीत होणार सहभागी
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ग्रेट ब्रिटन सामन्यादरम्यान FIH आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अमित रोहिदासला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले. जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तो सहभागी होणार नाही. भारत फक्त 15 खेळाडूंसोबत खेळणार आहे. मात्र, हॉकी इंडियाने त्यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
भारतीय संघाचा ब्रिटनवर ग्रेट विजय
अमित रोहिदासला लाल कार्ड मिळाल्यानंतर भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनविरुद्ध 10 खेळाडूंसह खेळून दमदार कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी खेळाचे महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 22 व्या मिनिटालाच गोल केला. पण, यानंतर ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टनने गोल करीत स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला. नंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेश सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने या सामन्यात अशी कामगिरी केली, जी दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याने ब्रिटीश खेळाडूंना गोल करण्याच्या फारशा संधी दिल्या नाहीत. श्रीजेशमुळेच हॉकी संघाने शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला.