सौजन्य - India_AllSports
Paralympics Games 2024 : भारतीय खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आणखी दमदार कामगिरी करीत पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. मराठमोळ्या सचिन खिलारी याने गोळाफेकमध्ये भारताला आणखी एक रौप्यपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करागणी या छोट्याशा गावातील सचिन सर्जेराव खिलारी ( Sachin Sarjerao Khilari) याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या गोळाफेक इवेंटमधील F46 प्रकारात त्याने भारतासाठी रौप्य पदक पटकावले. पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे २१ वे पदक आहे.
#Silver🥈for Sachin🤩🥳#ParaAthletics: Men's Shot Put F46 Final👇
Sachin Khilari gets #Silver with an Area Record (Asian) of 16.32m 😍 marking Medal No. 21 for India at the #ParisParalympics2024🥳
Let's #Cheer4Bharat, everyone!! Keep streaming the #Paralympics2024 on Jio… pic.twitter.com/S2NBrs5Vjm
— SAI Media (@Media_SAI) September 4, 2024
एवढ्या अंतरावर पडला सचिनचा गोळा!
अंतिम फेरीत सचिन याने १६.३२ मीटर अंतर गोळा फेकून पदकाची आपली दावेदारी भक्कम केली होती. कॅनडाच्या ग्रेगनं १६.३८ मीटर गोळा फेकत सुवर्णाला गवसणी घातली. या दोघांशिवाय क्रोएशियाचा लुका हा १६.२७ मीटर अंतरावर गोळा फेकत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने कांस्य पदक पटकावले.
आधी पॅरा गेम्समधील भालाफेकमध्ये लक आजमावल, हातानंतर खांद्याला पटका बसल्यावर गोळाफेकमध्ये आला
नववीच्या वर्गात शिकत असताना सायकलवरून पडल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. गँगरिनमुळे डाव्या हाताच्या कोपराच्या खालील भागाला कायमस्वरुपी अपंगत्व आले होते. पॅरा क्रीडा प्रकारात आधी तो भालाफेक प्रकारात खेळायचा. पण खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर सांगलीच्या या पठ्ठ्यानं हार न मानता गोळाफेक प्रकारात भाग घेण्याचा निर्णय घेतला. जागतिक स्पर्धेत भारताची मान अभिमानानं उंचावणाऱ्या सचिननं पॅरिस येथील पॅरालिम्पिकमध्येही कमाल करून दाखवली. तो इंजिनिअरिंगमधील पदवीधर आहे.