पंतप्रधान मोदींनी घेतली 1996 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट!(फोटो-सोशल मीडिया)
कोलंबो : भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच श्रीलंका दौऱ्यावरून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1996 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंची भेट घेतली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी विशेष चर्चा देखील केली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या विश्वचषक विजेत्या संघाचे भरभरून कौतुक करताना म्हटले आहे की, ‘देशाच्या आक्रमक आणि नाविन्यपूर्ण शैलीने T20 क्रिकेटच्या आगमनाची पूर्वछाया निर्माण केली आहे.’ मोदींसोबतच्या या भेटीवेळी, श्रीलंकेच्या 1996 च्या विश्वचषक विजेत्या संघात सनथ जयसूर्या, चामिंडा वास, मारवान अटापट्टू, अरविंदा डी सिल्वा, रवींद्र पुष्पकुमारा, उपुल चंदना, कुमार धर्मसेना आणि रोमेश कालुविथरना हे खेळाडू उपस्थित होते.
हेही वाचा : SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात.., पहा व्हिडिओ
पंतप्रधान मोदी यांनी संघाशी संवाद साधत असताना सांगितले की, भारताचा 1983 विश्वचषक विजय आणि श्रीलंकेचा 1996 च्या विजयाने जागतिक क्रिकेट परिदृश्यात परिवर्तनाची भूमिका बजावली आहे, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. 1996 च्या विश्वचषकामध्ये श्रीलंकन क्रिकेटच्या आक्रमक आणि अभिनव शैलीने एकप्रकारे टी-20 क्रिकेटला जन्म दिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी मान्य केले आहे.
A wonderful conversation with members of the Sri Lankan cricket team that won the 1996 World Cup. Do watch… pic.twitter.com/3cOD0rBZjA
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2025
बेट राष्ट्राच्या भेटीदरम्यान या वेळी मोदींनी 1996 मध्ये बॉम्बस्फोटानंतरही भारताच्या श्रीलंका दौऱ्याची आठवण करून दिली. तसेच त्यांनी क्रीडाभावना आणि चिरस्थायी मैत्रीचे मजबूत प्रतीक असल्याचे वर्णन करून दिले. 2019 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच श्रीलंकेला भेट दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीलंकेच्या खेळाडूंनी आणि अधिकाऱ्यांकडून मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांना श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागात, विशेषत: जाफनामध्ये उच्च दर्जाच्या क्रिकेट मैदान उभरणीसाठी पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटावेळी भारताने उदारपणे मदत केल्याबद्दल क्रिकेटपटूंकडून मोदींचे आभार मानण्यात आले.
काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने हैद्राबाद संघाचा पराभव केला. सामन्यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने 152 धावा केल्या. प्रतिउत्तरात जीटी संघाने 16.4 ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण केले आणि विजय संपादन केला.