SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात(फोटो-सोशल मीडिया)
SRH vs GT : आयपीएल 2025 मध्ये काल (6 एप्रिल)सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैद्राबद संघाचा पराभव केला. सामन्यापूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर हैद्राबाद प्रथम फलंदाजी करत 152 धावा केल्या. प्रतिउत्तरात जीटी संघाने हे लक्ष्य 16.4 ओव्हरमध्येच पूर्ण करून विजय संपादन केला. या सामन्यात एक मोठी घटना घडली आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वॉशिंग्टन सुंदर ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने 29 चेंडूमध्ये 49 धावा केल्या.
गुजरात टायटन्सच्या डावादरम्यान 14 व्या ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने मोहम्मद शमीच्या शॉर्ट लेन्थ बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने टोलवले आणि अनिकेत वर्माने त्याचा झेल टिपला. मात्र, अनिकेत वर्माने क्लीन कॅच घेतला होता का? याबाबत मैदानावर हजर असणाऱ्या पंचांना शंका होती. तेव्हा त्यांनी पंचांनी हा निर्णय घेण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांकडे सरकवली. त्यावेळी रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू कदाचित जमिनीला स्पर्श करत होता. परंतु, तिसऱ्या पंचाने मात्र वॉशिंग्टन सुंदरला बाद ठरवले. यावरून चांगलाच गदारोळ उठला आहे.
तिसऱ्या पंचाच्या निर्णयानुसार वॉशिंग्टन सुंदर बाद ठरला. वॉशिंग्टन सुंदरच्या हा विकेट नंतर सोशल मिडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तसेच अनेकांकडून या निर्णयावर टीका देखील केली आहे. मात्र, वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्याने गुजरात टायटन्सला फारसा फरक पडलेला दिसला नाही. कारण, मोहम्मद सिराजच्या टिच्चून गोलंदाजीसमोर हैद्राबादचा संघ टिकाव धरू शकला नाही.
The ball is clearly touching the ground,
Washington Sundar was give false out, he was not out,
How come the TV umpire didn’t noticed this angle?#SRHvsGT #IPL2025 #TATAIPL2025 @SunRisers @gujarat_titans pic.twitter.com/UKDpDOglSF
— Ritesh More (@riteshrmoficial) April 6, 2025
काल सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात जीटीने हैद्राबादचा पराभव केला. सामन्यापूर्वी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने 152 धावा केल्या. प्रतिउत्तरात जीटी संघाने 16.4 ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण केले आणि विजय संपादन केला.
गुजरात टायटन्स संघ : ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.
सनरायझर्स हैदराबाद संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, रवी श्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा.