फोटो सौजन्य - मीडिया
नीरज चोप्रा-पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने ८ ऑगस्ट रोजी भारतासाठी सिल्वर मेडल नावावर केले आणि ऑलिम्पिकचे दुसरे पदक मिळवले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर जगभरामध्ये त्याची चर्चा होत आहे. यंदा त्याने त्याच्या टोकियो पेक्षा जास्त थ्रो करूनही तो दुसऱ्या स्थानावर राहिला कारण पाकिस्तानचा ॲथलेटिक्स अरशद नदीम याने त्याच्या करियरची सर्वात्तम थ्रो करून पाकिस्तानला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. नीरज चोप्राला सिल्वर मेडल मिळाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्डन बॉयशी संवाद साधला आणि त्याला दुसऱ्या भारतासाठी पदक मिळवल्यामुळे शुभेच्छा दिल्या.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला त्याने सिल्वर मेडल मिळवल्यामुळे शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, रात्री एक वाजता सुद्धा भारताचे प्रेक्षक तुझ्याकडून मोठ्या आशेने पाहत होते. तू खूप चांगले केले आहेस. तू आधी मला भेटला होतास तेव्हा तू तुझ्या प्रतिस्पर्धीचे कौतुक केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नीरजला म्हणाले की, तुझ्या दुखापतीच काय करायचं आहे. यावर नीरजने सांगितलं की सर आम्ही आता टीमशी बोलून यावर उपाय काढणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तू आधी तुझ्या डोक्यामधून सुवर्ण पदक काढून टाक आणि दोन वेळा पदक जिंकणारे फार कमी आहेत आणि तू त्यामध्ये नाव नोंदवले आहेस. त्यामुळे माझ्या तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू जेव्हा मला भेटशील तेव्हा तुझ्या दुखापतीवर आपण उपाय काढणार आहोत असे नरेंद्र मोदी म्हणाले.
यावर नीरज चोप्रा पंतप्रधानांना म्हणाला की, सर मी माझ्या परीने प्रयत्न केले पण माझ्या दुखापतीमुळे जास्त अंतर पार करू शकलो आणि त्यामुळे सुवर्ण पदक हुकले. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी पण मोठे होते, पण खूप चांगली स्पर्धा होती आणि अशाच स्पर्धा सुरु असणार आहेत. त्यामुळे आता पुढे आणखी मेहनत करू आणि पुढील स्पर्धा असणार आहेत ते चांगल्या प्रकारे खेळू. देव जेव्हा आपल्यासोबत होता तेव्हा आपण सुवर्ण जिंकले होते आणि मी आता सुवर्ण पण काढून टाकले आहे. आता खूप स्पर्धा बाकी आहेत आणि मी माझ्याकडून मेहनत करत राहील.
Prime Minister Narendra Modi called & congratulated Neeraj Chopra for winning Silver Medal in Paris Olympics. 🇮🇳 pic.twitter.com/DyPIBUZmQD
— Johns. (@CricCrazyJohns) August 9, 2024