पूजा तोमर : भारताची पहिली MMA (Mixed martial arts) महिला फायटर पूजा तोमरने (Puja Tomar) आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तुरा रोवला आहे. पूजा तोमर ही अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये (Ultimate Fighting Championship) पदार्पण करणारी पहिली महिला आहे. त्याचबरोबर तिने या फाईटमध्ये जिंकून भारताच्या मिक्स मार्शल आर्ट्सला वेगळ्या स्तरावर नेले आहे. पूजाने ऑक्टोबर 2023 मध्ये UFC चा कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता. तिने इव्हेंटच्या पहिल्याच फाईटमध्ये ब्राझीलची रायने डॉस सँटोसचा सामना केला आणि विभाजित निर्णयाद्वारे जिंकली. या विजयासह, ती UFC मध्ये विजय मिळवणारी पहिली भारतीय फायटर ठरली. पूजाने रायने अमांडा डॉस सँटोसचा 30-27, 30-27, 29-28 असा पराभव केला. (फोटो सौजन्य – UFC India इंस्टाग्राम अकाऊंट)
[read_also content=”भारत-पाक सामन्याचे महायुद्ध कधी आणि कुठे पाहत येईल? वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/sports/when-and-where-will-we-watch-the-great-war-of-india-vs-pakistan-match-544731.html”]
अंशुल जुबलीचा आनंद गगनात!
अंशुल जुबलीचा (Anshul Jubli) पूजा तोमरची फाईट पाहतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामध्ये भारताचा MMA फायटर अंशुल जुबलीने 2023 मध्ये UFC मध्ये पदार्पण करताना दिसला. परंतु तो त्याच्या पहिल्या फाईटमध्ये पराभूत झाला. अशुल नेहमीच त्याच्या फायटर मित्रांना सपोर्ट करताना दिसला आहे. यावेळी जेव्हा पूजाच्या सामन्याचा निकाल आला तेव्हा त्याचा आनंद अत्यंत अविस्मरणीय होता. तो निकाल येताच उड्या मारू लागला. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या प्रतिक्रिया
जेव्हापासून पुजा तोमरच्या सामन्याची घोषणा झाली होती. तेव्हापासून चाहत्यांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली होती. पुजा तोमर हे MMA विश्वामध्ये गाजलेले नाव आहे. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ हिने पूजाला खूप सपोर्ट केला. सोशल मीडियावर पूजावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
पूजा तोमरने जिंकलेले टायटल
पूजाने नोव्हेंबर 2022 मध्ये MFN स्ट्रेटवेट मध्ये विरोधक बी न्गुयेनला पराभूत करून विजय मिळवला होता. एवढेच नव्हे तर जुलै 2023 मध्ये पूजाने तिच्या विजेतेपदाचा बचाव रशियाच्या अनास्तासिया फेओफानोव्हाविरुद्ध केला होता.