पीव्ही सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव (फोटो- ians)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूचा पराभव
४३ मिनिटांच्या सामन्यात पीव्ही सिंधूचे फायनलचे तिकीट चुकले
जपानच्या अकाची यामागूचीने केला पराभव
P.V. Sindhu: पी. व्ही. सिंधू ही भारताची स्तर बॅडमिंटनपटू खेळाडू आहे. दोन वेळेस ऑलिंपिक विजेती पी. व्ही. सिंधूचा ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ च्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला आहे. भारताची (Sports) स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. यामुळे पी. व्ही. सिंधूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन ओपन २०२६ च्या सेमीफायनलमध्ये पी. व्ही. सिंधूचा पराभव झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिल्या जेतेपदाची तिची प्रतीक्षा कायम राहिली आहे. जपानच्या अकाने यामागुचीने पी. व्ही. सिंधूचा पराभव केला आहे.
पहिल्या डावात पी. व्ही. सिंधूने यामागूचिला जोरदार टक्कर दिली. अर्धा डाव होईपर्यंत तिने काही पॉईंट्सची आघाडी घेतली. मात्र त्यानंतर यामागुचीने सलग ६ पॉईंट्स मिळवून शानदार कमबॅक केले. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर यामागुचीने सात सलग गुण घेत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. सिंधूच्या या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आले आहे.
पीव्ही सिंधूचा बीडब्ल्यूएफमधील विजेतेपदाचा दुष्काळ अजूनही कायम आहे. २०२६ मध्ये सिंधुची ही दुसरी सेमीफायनल होती. यापूर्वी तिने मलेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती, तिथे तिला चीनच्या वांग झियीकडून पराभव पत्करावा लागला होता. या सेमीफायनलमध्ये देखील तिचा पराभव झाला आहे. आता भारतीय खेळाडूंचे लक्ष पुढील आठवड्यात होणाऱ्या मकाऊ ओपन स्पर्धेकडे लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे…






