Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी

मुजावर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या स्वरा कुंजीर, स्वरा गाडे आणि श्रावणी रावळ यांनी महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणवीर पांगारे आणि शौर्य कोंडे यांनी महाराष्ट्राच्या निवड चाचणी शिबिरापर्यंत मजल मारली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 04:08 PM
जिद्दीला सलाम! हताश न होता ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना दिली ढाल; राजू मुजावर यांची ‘न भूतो’ कामगिरी
Follow Us
Follow Us:
  • शिवगंगा खोऱ्यातील अकादमीतून राजू मुजावर घडवतात गुणवंत क्रिकेटपटू
  • अनेक खेळाडू पाडतायेत राज्यस्तरावर आपली छाप
  • अनेकांनी मारली हाराष्ट्राच्या निवड चाचणी शिबिरापर्यंत मजल
पुणे: शिवगंगा खोऱ्यातील खेडशिवापूर येथे माजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू राजू मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मुला-मुलींना दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण दिले जात आहे. क्रिकेटसारख्या खर्चिक खेळात ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमातून अनेक खेळाडू राज्यस्तरावर आपली छाप पाडत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मुजावर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या स्वरा कुंजीर, स्वरा गाडे आणि श्रावणी रावळ यांनी महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणवीर पांगारे आणि शौर्य कोंडे यांनी महाराष्ट्राच्या निवड चाचणी शिबिरापर्यंत मजल मारली आहे. श्रवण वाव्हळ, अलंकार पारवे आणि पृथ्वीराज कोंडे यांनी विविध निमंत्रित १४ व १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकादमीत अनेक होतकरू खेळाडूंना तांत्रिक मार्गदर्शन, नियमित सराव आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जात असल्याने ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळत आहे.

नुकताच २३ जुलै रोजी राजू मुजावर यांचा वाढदिवस खेळाडू आणि पालकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष मेळाव्यात पालक आणि खेळाडूंना क्रिकेटमधील संधी, शिस्त आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन सीएस इन्फोकॉमचे अनिल जोगळेकर, दिव्यांग क्रिकेट असोसिएशन (पुणे जिल्हा) तसेच शरद सावंत, राहुल पांगारे, राहुल वाव्हळ, गणेश घुले, दत्तात्रय दराडे, गणेश खांदवे, कृष्णा गावरस्कर, संजय कुंजीर, संतोष गुप्ता आणि मुकेश पडवळ यांनी केले.

ऋतुराज तावरेची ७८ धावांची तुफानी खेळी! ‘डीएसपी करंडक मान्सून लीग’मध्ये पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सुरुवात

वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम

पद्मश्री अजित वाडेकर क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीदरम्यान विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. खेळाडूंच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या मातांचा यावेळी विशेष सन्मानही करण्यात आला.

प्रशिक्षणासाठीच शुल्काचा वापर

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना क्रिकेटपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी राजू मुजावर विशेष प्रयत्न करतात. अकादमीकडून आकारण्यात येणारे शुल्क केवळ अकादमीच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणावर खर्च केले जाते. अनेक गरजू खेळाडूंच्या संगोपनाची जबाबदारीही त्यांनी स्वतः स्वीकारली आहे.

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका! जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची ३ सुवर्णांसह २० पदकांची कमाई

सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण

स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला दिशा देण्याचे कार्य राजू मुजावर सातत्याने करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्या या कार्यामुळे अनेक ग्रामीण खेळाडूंना नवी उमेद आणि संधी मिळत आहे. त्यांच्या सामाजिक व क्रीडा योगदानाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: Raju mujawar pune abled former cricketer provides quality cricket training boys and girls from rural areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय
1

पुणेरी स्ट्रायकर्सचा ‘धडाका’! फिअरलेस फायटर्सला चारल्या माती; डीएसपी कपमध्ये सलग दुसरा विजय

40 कोटी खर्चुनही शहर अस्वच्छ राहिल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; अमोल बालवडकर यांचा इशारा
2

40 कोटी खर्चुनही शहर अस्वच्छ राहिल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरणार; अमोल बालवडकर यांचा इशारा

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई
3

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!
4

Startup India: ‘स्टार्टअप इंडिया’ची १० वर्षे; ३३ हजारांहून अधिक स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात नंबर वन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.