जगात असे अनेक आश्चर्य आहेत जे पाहिले किंवा ऐकले की आपसुकच तोंडात हात जातो. असं म्हणतात की, आताचं बाळ भविष्यात कसं असेल हे साधारण त्याच्या हलचालींवरुन जाणवतं. त्यालाच आपल्याकडे एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मात्र रत्नागिरीतील दीड वर्षाची चिमुरडी पाय पाळण्यात नाही तर पाण्यात पोहताना दिसत आहे. घरात दुडूदु़डू धावणारं बाळ पाण्यात पोहचण्यासाठी हातपाय मारत असल्याचा व्हिडीओ सध्य़ा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रत्नागिरीची वेदा सरफरे ही दीड वर्षाची मुलगी पाण्यात सराईतपणे पोहत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार गाजतोय. या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना. नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरूवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास 1 वर्ष 9 महिन्याची असून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहचला आहे. 100 मीटरचे अंतर केवळ 10मिनिट 8 सेंकदात पूर्ण केलं. तिच्या या कामगिरीबाबत वेदा भारतातील सर्वात लहान जलतरण पटू म्हणून तिचं कौतुक करण्यात येतंय.
नऊ महिन्याची हि चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकतं होती.वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो.तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे.रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या कंबरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पहायची.एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी मैत्रीच केली.हळूहळू ती पोहायला लागलीआणि आता जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो.
वेदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. फक्त इंडियन बुक ऑफ रेकॉर्डच नाही तर एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील या दोन वर्षाच्या चिमुकलीने आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं.
Ans: वेदा सरफरे ही रत्नागिरीतील १ वर्ष ९ महिन्यांची चिमुरडी आहे, जी अत्यंत कमी वयात पोहण्यातील कौशल्यामुळे चर्चेत आली आहे.
Ans: प्रशिक्षक महेश मिलके यांनी एकदा तिला पाण्यात सोडले. आश्चर्य म्हणजे, ती रडली नाही; उलट हातपाय मारत तिने पाण्याशी दोस्ती केली.
Ans: रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात ती नियमित सराव करते.






