रिंकू सिंग(फोटो-सोशल मीडिया)
Rinku Singh tied a rakhi to her bat : आज रक्षाबंधन सर्व देशात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाला राखी बांधत असते. परंतु टीम इंडियाचा एका दिग्गज फलंदाजाने मात्र त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणलेल्या व्यक्तीला राखी बांधली आहे. हो आपण भारताच्या स्टार खेळाडू रिंकू सिंगबद्दल बोलत आहोत. त्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते आनंदी झाले आहेत. रिंकू सिंग हा टायच्या विस्फोटक फालंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या फलंदाजीने अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.तसेच तो आयपीएल मध्ये देखील धामकेदार कामगिरी करता असतो. अलीकडेच त्याचा आणि सपा खासदार प्रिया सरोजचा साखरपुडा झाला आहे ते दोघे नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. या दरम्यान त्यांचा राखी बांधतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा : न्यूझीलंडचा झिम्बाब्वेला धोबीपछाड! कसोटी मालिकेत २-० असा मिळवला विजय..
कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या रिंकू सिंगने त्याच्या बॅटला राखी बांधली आहे, ज्या बॅटने त्याने २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सलग पाच षटकार खेचले होते.या खेळीने केकेआरला शानदार विजय मिळवून दिला होता. या बॅटची राखी बांधत असताना रिंकू सिंगने तिचे मनापासून कौतुक देखील केले.
रिंकू सिंग म्हणाला की, “माझी कारकीर्द तुझ्यामुळे घडली आहे. तुझ्यामुळे मी आज एक सेलिब्रिटी देखील झालो आहे. तुझ्यामुळे, आता आकाश देखील ठेंगणे वाटते. तुझ्यामुळे, माझी सर्व स्वप्ने सत्यात अवतरली आहेत. केवळ तुझ्या त्या पाच षटकारांमुळेच, आयुष्य एक सुंदर प्रवास बनला आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा”. रिंकू सिंगने या सर्व गोष्टीचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि तो त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचवर चहात्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
आयपीएल २०२३ चा १३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ४ गडी बाद २०४ धावा उभ्या केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करत असताना केकेआरच्या संघाला शेवटच्या षटकात चेंडूत २९ धावांची आवश्यकता होती, तेव्हा हा सामना गुजरात टायटन्स जिंकेल असे वाटत होते. परंतु, तेव्हा १६ चेंडूत १८ धावा काढल्यानंतर रिंकू सिंग मैदानावर खेळत होता.
त्याच्यासोबत उमेश यादव ४ धावा काढून मैदानावर पाय रोवून उभा होता. गुजरात टायटन्सकडून वेगवान गोलंदाज यश दयालने शेवटचा ओव्हर टाकत होता. पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने धाव घेऊन रिंकू सिंगला स्ट्राईक दिला आणि त्यांनतर रिंकू सिंगने उरलेल्या पाच चेंडूवर सलग पाच षटकार मारले आणि संघाला ३ गडी राखून शानदार विजय मिळवून दिला. त्या सामन्यात रिंकू सिंगने २१ चेंडूचा सामना करत ४८ धावांची नाबाद खेळी केली, यामध्ये त्याने १ चौकार आणि ६ षटकार मारले. इथून रिंकूचे आयुष्य बदलले.