बहुचर्चित आशिया कप (Asia Cup) स्पर्धा २७ ऑगस्ट पासून सुरु होणार असून आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्वच संघ सराव सत्रात घाम गाळताना पहायला मिळाला आहे. दरम्यान, अनेक चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी तसेत त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
भारतीय संघ यूएईमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या चाहत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातच भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत रोहित शर्मा (Rohit Sharma) चाहत्याला अनोख्या पद्धतीने मिठी मारताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. तर, एका चाहत्याने त्याला मिठी मारण्याची विनंती केली.
रोहितने उत्तर दिले की लोखंडी जाळीमुळे हे करणे कठीण आहे. परंतु, चाहत्यांची धडपड पाहून रोहित शर्मानने लोखंडी जाळीतूनच त्याला मिठी मारली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
पहा रोहित शर्मा आणि चाहत्याचा ‘तो’ व्हिडीओ :
Captain Rohit Sharma greeted some Pakistani fans on the ground. Such a lovely guy, The Hitman! pic.twitter.com/EakErJNsWt — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2022