फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीचा चौथा सामना सध्या खेळवला जात आहे. या चौथ्या सामन्यात भारताच्या संघाची हालत ही खिळखिळी झाली आहे. भारताच्या संघाने आतापर्यत चांगली फलंदाजी केली आहे पण गोलंदाजीमध्ये भारत मागे दिसला, टीम इंडियाने आत्तापर्यंत या सिरीजमध्ये फक्त एक सामाजिक जिंकला आहे तर इंग्लंडच्या संघाने दोन सामने जिंकले आहेत त्यामुळे इंग्लिश संघाकडे या मालिकेची आघाडी आहे.
टीम इंडियाला या मालिकेमध्ये टिकून राहण्यासाठी सामना ड्रॉ किंवा विजय मिळवणे गरजेचे आहे. भारताच्या संघाने सामन्यात विजय मिळवला तर मालिकेत बरोबरी होईल आणि जर सामना ड्रॉ झाला तर इंग्लंडकडे आघाडी राहील. सध्या दुसऱ्या इनिंग मध्ये इंग्लंडचा संघाने आघाडी घेतली आहे. चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू आहे आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर असे म्हणता येईल की भारतीय संघ केवळ सामना गमावण्याच्या धोक्यात नाही तर शुभमन गिल आणि कंपनी मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे.
आतापर्यंत खेळलेले तीनही सामने जवळचे झाले आहेत आणि शेवटच्या दिवशी पोहोचले आहेत, परंतु चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला डावाने पराभव स्वीकारावा लागला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण संघाची कामगिरी आतापर्यंत अशीच राहिली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ३५८ धावा केल्या, तर तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ७ विकेट गमावून ५४४ धावा केल्या आहेत.
IND vs ENG : कसोटी क्रिकेटमधून जसप्रीत बुमराह निवृत्त होणार का? मोहम्मद कैफच्या व्हिडिओने खळबळ
इंग्लंडकडे सध्या १८६ धावांची आघाडी आहे. जर इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळले तर आघाडी सहजपणे २५० पर्यंत पोहोचू शकते. अशाप्रकारे, टीम इंडियाला डावाने पराभवाचा धोका आहे, कारण भारतासाठी सर्वात मोठे आव्हान २५० धावांचे अंतर भरून काढणे असेल, जे इंग्लंडमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या डावात कठीण काम आहे. भारतासाठी समस्या अशी आहे की ऋषभ पंतसारखा फलंदाज या सामन्यात जास्त फलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे भारताच्या संघामध्ये एक फलंदाज कमी खेळेल.
ऋषभ पंत आता पुढील इंनिगमध्ये खेळु शकणार नाही, भारताकडे अजूनही चार योग्य फलंदाज आहेत यामध्ये यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा साई सुदर्शन, परंतु शेवटी तुमच्याकडे तीन अष्टपैलू खेळाडू असतील. अशा प्रकारे, भारतासाठी खूप अडचणी निर्माण होणार आहेत. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच टीम इंडियाने परदेशात कसोटीत ५०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे, परंतु तो या सामन्यात फारसे काही करू शकला नाही.