Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Rules Change: …तर गोलंदाजांची चांदी होणार! IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले

आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आणि गोलंदाजांना न्याय मिळवून देण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बीसीसीआयला (BCCI) ३ अनोखे सल्ले दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 31, 2026 | 09:46 PM
IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले (Photo Credit- X)

IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • …तर गोलंदाजांची चांदी होणार!
  • IPL आणखी रोमांचक करण्यासाठी सचिन तेंडुलकरने BCCI ला दिले 3 अनोखे सल्ले
  • जाणून घ्या काय आहे ते…
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) गेल्या काही हंगामांमध्ये फलंदाजांचे प्रचंड वर्चस्व पाहायला मिळत आहे. आता या स्पर्धेत 20 षटकांत 200 धावा करणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना 200 हून अधिक धावा करूनही कोणताही संघ स्वतःला सुरक्षित समजत नाही. आयपीएल सामन्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या प्रामुख्याने फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने गोलंदाजांचे काम अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाज आणि गोलंदाजांमधील खेळाचा समतोल राखण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) काही महत्त्वाचे आणि अनोखे सल्ले दिले आहेत. बीसीसीआयने या सूचना स्वीकारल्यास आयपीएलचे सामने अधिक थरारक आणि रंजक होऊ शकतात. टी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांना संरक्षण देण्यासाठी आणि सामन्यात चुरस निर्माण करण्यासाठी सचिन तेंडुलकरने खालील 3 प्रमुख बदलांची शिफारस केली आहे:

1. ‘इम्पैक्ट प्लेयर’ नियम तातडीने रद्द करावा

सचिन तेंडुलकरच्या मते, टी-20 क्रिकेटमधून ‘इम्पॅक्ट प्लेयर रूल’ (Impact Player Rule) पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. मुंबईत आयोजित एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान बोलताना त्याने सांगितले की, या नियमामुळे खेळाचा मूळ समतोल बिघडत आहे. टी-20 सामना आधीच खूप लहान (फक्त 20 षटकांचा) असतो आणि या नियमामुळे संघांना त्यांच्या फलंदाजीच्या फळीत एका अतिरिक्त फलंदाजाचा समावेश करण्याची संधी मिळते. यामुळे आधीच दबावाखाली असलेल्या गोलंदाजांच्यासमोरील आव्हाने अधिक वाढतात, जे खेळाच्या दृष्टीने योग्य नाही.

IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…

2. पॉवरप्ले दोन टप्प्यात विभागला जावा

सचिनने दुसरी महत्त्वपूर्ण सूचना ‘पॉवरप्ले’बाबत केली आहे. सध्याचा पारंपारिक 6 षटकांचा पॉवरप्ले सलग एकाच वेळी घेण्याऐवजी तो दोन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागला जावा, असे सचिनचे म्हणणे आहे. सुरुवातीची ४ षटके फलंदाजांसाठी निश्चित असावीत, ज्यामध्ये सध्याच्या नियमानुसार 30-यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक (Fielders) असतील. उर्वरित २ षटके कधी वापरायची, याचा संपूर्ण निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारावर सोडला जावा. कर्णधार सामन्याची परिस्थिती पाहून मधल्या षटकांमध्ये (Middle Overs) किंवा डेथ ओव्हर्समध्ये (Death Overs) या 2 षटकांचा वापर करू शकेल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा असा होईल की, या 2 षटकांदरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सर्कलबाहेर एक अतिरिक्त म्हणजेच एकूण 3 क्षेत्ररक्षक ठेवण्याची परवानगी मिळेल. यामुळे कर्णधाराला धावांच्या वेगावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल.

3. मुख्य गोलंदाजाला 5 षटके टाकण्याची संधी मिळावी

टी-20 सामन्यात सध्या एका गोलंदाजाला जास्तीत जास्त 4 षटके टाकण्याची परवानगी असते. सचिनच्या मते, हा नियम बदलून ती मर्यादा 5 षटकांची करावी. जेव्हा संघाचा सर्वात महत्त्वाचा आणि गुणवान फलंदाज पूर्ण 20 षटके फलंदाजी करू शकतो, तर संघातील सर्वात सर्वोत्तम गोलंदाजालाही एक अतिरिक्त षटक टाकण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे प्रतिपादन सचिनने केले. यामुळे सामन्याचा थरार आणि दर्जा दोन्ही सुधारेल, कारण चाहत्यांना नेहमीच सर्वोत्तम खेळाडूंचा मैदानावरील संघर्ष पाहायला आवडतो.

प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या ‘या’ रेकॉर्डशी केली बरोबरी

Web Title: Sachin tendulkar gives 3 unique suggestions to the bcci to make the ipl even more exciting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL
  • Sachin Tendulkar
  • Sports News

संबंधित बातम्या

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
1

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
3

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
4

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.