फोटो सौजन्य - Social Media
दशकापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ सिनेप्रेक्षकांना फार भावला होता. या चित्रपटाची चर्चा अजून आहे, या चित्रपटातील गाणे अजूनही लोकांच्या मुखावर आहे. पण प्रसिद्ध मराठी अभिनेत्री इशा कोप्पीकरच्या काही विधानांनी या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. मुळात, बाजीराव मस्तानी हा सिनेमा काही वर्षांपासून बनवला जात होता. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी या सिनेमाचा विचार आणि सुरुवात सिनेमा प्रदर्शित होण्याच्या १५ वर्षांअगोदरच केली होती. यावर इशा कोप्पीकरने भाष्य केले आहे.
ईशाचे असे म्हणणे होते की,” बाजीराव मस्तानी सिनेमामध्ये ती काशीबाई हे पात्र करण्यासाठी इच्छुक होती. त्यासाठी ती सिनेमाचे डिरेक्टर संजय लीला भंसाळी यांच्याकडेही गेली होती.” तिचे म्हणणे आहे की या सिनेमाच्या सुरुवातीच्या कामाच्या टप्प्यात जी कास्टिंग करण्यात आली होती. ती पूर्णता वेगळी होती. संजय लीला भंसाळी यांनी इशाला स्वतःहून ते पात्र ऑफर केले नव्हते असे ही तिने सांगितले आहे.
बाजीराव मस्तानी चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग पहिले बाजीराव पेशवे यांच्या भूमिकेत दिसून आला होता. तर दीपिका पादुकोणने मस्तानीची भूमिका साकारली होती. प्रियांका चोप्रा काशीबाई यांच्या भूमिकेत दिसून आले होते. त्याचसह अनेक कलाकार या चित्रपटात दिसून आले होते. पण इशा हिच्या मते सिनेमाच्या पूर्व निर्मीतीच्या काळात कास्टिंग पूर्णतः वेगळी होती. सलमान खान, अभिनेत्री ऐश्वर्या राय मुख्य पात्रांसाठी कास्ट करण्यात आले होते, असे वृत्तांचे मत आहे.
संजय लीला भंसाळी यांनी त्या काळात सलमान खान आणि ऐश्वर्या रायसह काम करत हिट सिनेमे दिले आहेत. तो काळ इशा कोप्पीकरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळ होता. ईशाने नुकतेच ‘ अयालान’ या तामिळ चित्रपटात काम केले होते.