बॉक्सिंग स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धा २०२६ मध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगट व वजन गटांत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ प्रथम क्रमांक व १ द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वीरेंद्र गाजरे याने २५ ते ३० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अवधूत भांबरे (३०–३५ किलो), सोहम नितीन शेलार (४०–४५ किलो), कार्तिक गुंडे (४५–५० किलो) आणि संस्कार डुकरे (६०–६५ किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी चौधरी (३०–३५ किलो), श्रावणी चौधरी (३५–४० किलो) आणि रुद्र आहेर (४५–५० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश विश्वासराव (६०–६५ किलो), विघ्नेश पवार (८२ किलो) आणि जीवन बांगर (८२ किलोपेक्षा अधिक) यांनी सुवर्ण कामगिरी केली.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात समृद्धी जाधव (६५ किलोपेक्षा अधिक), प्रचिती इंगळे (४६–४८ किलो), इशिता काकडे (४२–४४ किलो) आणि दीक्षा भोर (५५–६० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बॉक्सिंगमध्ये आदित्य सूर्यवंशी याने जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जिल्हास्तरावर प्रभावी कामगिरी केली. बुद्धिबळात अवनी औटी हिने एकाग्रता, संयम, अचूक निर्णयक्षमता आणि डावपेचात्मक कौशल्याच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप






