फोटो सौजन्य - JioHotstar
संजू सॅमसन : काल राजस्थान विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये भिडत पाहायला मिळाली. कालचा मनोरंजक सामना सुपर ओव्हरपर्यत खेळवण्यात आला आणि दिल्लीच्या संघाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. कालच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर मिचेल स्टार्कने संघासाठी कौतुकास्पद कामगिरी केली संघाला विजय मिळवून दिला. कालच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सने सुरुवात चांगली केली होती पण शेवटी संघाच्या फलंदाजांनी अनेक चुका केल्या आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
कालच्या सामन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यामध्ये संजू सॅमसनला मैदानावरील अंपायर फाटकारताना दिसत आहेत. नक्की प्रकरण काय आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरच्या मदतीने सामन्याचा निकाल लागला. ट्रिस्टन स्टब्सच्या फलंदाजीला षटकार मारून दिल्लीने हंगामातील पाचवा विजय मिळवला. पराभवासोबतच कर्णधार संजू सॅमसनला पंचांकडून फटकारले गेले.
3rd umpire checking wide for 3 minutes.
3rd umpire gave Sanju Samson’s decision within a minute. pic.twitter.com/emnPH3vCpC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 7, 2024
खरंतर, दिल्लीच्या डावाच्या २० व्या षटकात, पंचांनी जोफ्रा आर्चरचा एक चेंडू वाइड घोषित केला आणि त्यानंतर तो संजू सॅमसनकडे गेला. संजू ३० यार्ड वर्तुळाच्या अगदी कोपऱ्यावर उभा होता आणि पंचांनी राजस्थानच्या कर्णधाराला याबद्दल इशारा दिला. संजू पंचांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतानाही दिसला. तथापि, पंचांनी संजूला कडक शब्दांत फटकारले. सामन्यात फलंदाजी करताना सॅमसनलाही दुखापत झाली आणि त्याला दुखापतीमुळे रिटायर होऊन मैदान सोडावे लागले.
कालच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सला ध्रुव जुरेलची चूक महागात पडली. ध्रुव जुरेलने चूक केली नसती तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता. खरंतर, राजस्थान रॉयल्सला शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी २ धावांची आवश्यकता होती पण २ धावा घेत असताना ध्रुव जुरेल धावबाद झाला, जर जुरेलने थोडे अधिक धाडस दाखवले असते तर कदाचित तो क्रीजवर पोहोचला असता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला नसता. सुपर ओव्हरमध्ये, राजस्थानने प्रथम फलंदाजी करत ११ धावा केल्या, जे दिल्ली कॅपिटल्सने फक्त ४ चेंडूत साध्य केले. शेवटच्या षटकात, मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक अद्भुत गोलंदाजी सादर केली.