क्रिकेट पंच(फोटो-सोशल मीडिया)
What are the qualifications of a BCCI umpire? : भारतात क्रिकेट हा खूप लोकप्रिय खेळ असून मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. क्रिकेट हा खेळ लाखो लोकांच्या भावना आणि आकांक्षा देखील सामावून घेणारा आहे. देशातील बहुतेक तरुण क्रिकेटमध्ये करिअर करण्याची आकांक्षा बाळगून असतात. तथापि, हा खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित नसून क्रिकेटमध्ये पंचिंग करणे देखील करियरचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये देखील प्रसिद्धी, आदर आणि चांगले उत्पन्न देण्याची क्षमता आहे.
जर तुम्हाला क्रिकेटची जाण असेल, तसेच त्याच्या नियमांचे ज्ञान असेल, तर तुम्हाला पंच बनून बीसीसीआयमध्ये करिअर करण्याची संधी आहे. आज, आम्ही तुम्हाला बीसीसीआयमध्ये पंच बनण्याबद्दलच्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेऊया.
अंपायर होण्यासाठी प्रथम क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नाही. तर त्याचे नियम, तंत्रे आणि सामन्याच्या परिस्थितीची सखोल समज असणे गरजेचे आहे. चांगले संवाद कौशल्य, अचूक निर्णय घेण्याची क्षमता, स्पष्ट दृष्टी आणि दीर्घकाळ उभे राहण्याची शारीरिक ताकद हे देखील गुण असणे आवश्यक आहेत.
अंपायरिंगची सुरुवात राज्य क्रिकेट संघटनेच्या सदस्यत्वापासून होत असून यानंतर, उमेदवाराला राज्य स्तरावर होणाऱ्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा अनुभव मिळवणे गरजेचे असते. हा अनुभव पुढे बीसीसीआय लेव्हल १ पंच परीक्षेसाठी देखील पात्र ठरतो. बीसीसीआय दरवर्षी लेव्हल १ पंच परीक्षेचे आयोजन करत असते. परीक्षेच्या सुमारे तीन दिवस आधी, उमेदवारांना एक कोचिंग क्लास देण्यात येतो. ज्यामध्ये नियम, सामन्यांच्या परिस्थिती आणि पंचांच्या बारकाव्यांचे स्पष्टीकरण देण्यात येत असते. ही परीक्षा गुणवत्तेवर आधारित असते. लेव्हल १ उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना इंडक्शन कोर्स देखील करावा लागतो. त्यानंतर प्रॅक्टिकल आणि तोंडी चाचण्या देखील द्याव्या लागतात.
यानंतर, उमेदवार लेव्हल २ परीक्षेसाठी पात्र ठरत असून तो लेव्हल १ उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घ्यावा लागतो. लेव्हल २ उत्तीर्ण झाल्यानंतर, वैद्यकीय आणि शारीरिक चाचण्या पार पाडाव्या लागतात. सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवाराला बीसीसीआय-प्रमाणित पंच घोषित करण्यात येते. स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचांची बीसीसीआय आयसीसी पॅनेलसाठी देखील शिफारस करते.
अंपायरची कमाई त्यांच्या ग्रेड आणि सामन्याच्या पातळीवर अवलंबून राहिलेली असते. बीसीसीआय सामान्यतः घरगुती पंचांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करते: ज्यामध्ये अ, ब आणि क अशा श्रेणी असते.






