फोटो सौजन्य : X
श्रेयस अय्यर – शशांक सिंग : इंडीयन प्रिमियर लिग 2025 मध्ये फायनलचा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये खेळवण्यात आला होताय. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विजय मिळवून जेतेपद नावावर केले होते. पंजाब किंग्सच्या संघाला फायनलचा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. क्वालिफायर मध्ये पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता या सामन्यात श्रेयस अय्यरने कमालीची खेळी खेळली होती. क्वालिफायर दोनच्या सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस झाला होता.
या व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर हा शशांक सिंगवर संतापलेला पाहायला मिळाला होता. श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शशांक सिंग हा मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये धावबाद झाला होता सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यरने शशांक सिंग याला सुनावले होते त्यानंतर या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता या घटनेवर शशांक सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये मौन सोडले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शशांक सिंग म्हणाला, “मी ते पात्र होतो. अय्यरने मला थप्पड मारायला हवी होती. माझे वडील अंतिम सामन्यापर्यंत माझ्याशी बोलले नाहीत. मी बेफिकीर होतो, मी बागेत किंवा कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर फिरत नव्हतो. श्रेयस म्हणाला की मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते, पण नंतर तो मला बाहेर जेवायला घेऊन गेला.”
Rinku Singh Priya Saroj Engagement : रिंकू सिंह क्लीन ब्लोल्ड! प्रिया सरोजसोबत उरकला साखरपुडा
शशांक सिंगने आयपीएल २०२५ च्या हंगामात पंजाब किंग्जकडून १५३ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा केल्या होत्या. तो संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने श्रेयसचे कौतुक केले आणि म्हटले की त्याच्यापेक्षा चांगला कर्णधार कोणीच नाही.
#IPL #PunjabKings #RCB #ShreyasIyer #ShashankSingh #ViratKohli𓃵 #MI
See the aggression here.
Shreyas Iyer was waiting to meet Shashank Singh after the match, to bring out his real Emotions. 😂🫡 pic.twitter.com/o6RuSz5Tqa— Raks Josh (@RaksBravo) June 2, 2025
आयपीएलच्या अंतिम सामन्यात शशांक सिंगने दमदार खेळी केली. शशांकने नाबाद राहिला आणि ३० चेंडूत ६१ धावा केल्या. तथापि, तो पंजाब किंग्जला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि संघाला अंतिम सामना ६ धावांनी हरवावे लागले. सामन्यादरम्यान शशांकने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांना खूप मारहाण केली. शशांकने त्याच्या खेळीदरम्यान ३ चौकार आणि ६ षटकार मारले.