फोटो सौजन्य : X
रिंकू सिंग प्रिया सरोज एंगेजमेंट : काही दिवसांपूर्वीच भारताचा फिरकीपट्टू कुलदीप यादव यांनी साखरपुडा गुपचूप उरकला. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. आता तो सध्या इंग्लंड विरुद्ध होणारे कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला आहे. याच दरम्यान भारताचा फलंदाज रिंकू सिंग आणि प्रिया सरोज या दोघांच्या नात्यांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू होती. रिंकू सिंग याने आज प्रिया सरोजसोबत साखरपुडा उरकला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.
रिंकू सिंग हा काही दिवसांपूर्वी कुलदीप यादव यांच्या साखरपुड्याला दिसला होता यावेळी प्रिया सर्वच देखील फोटोमध्ये पाहायला मिळाली. आज त्यांचा साखरपुडा पार पडला या सारखपुड्याला बीसीसीआयचे अनेक अधिकारी उपस्थित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील रिंकू सिंग यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. त्याचबरोबर लोकसभेच्या सदस्य आणि अभिनेत्री जया बच्चन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
प्रिया सरोज ही एक राजकीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर एक वकील देखील आहे. त्याचबरोबर सध्या ती उत्तर प्रदेश मध्ये आमदार देखील आहे. साखरपुड्याला प्रिया सरोज हिने पिच कलरचा घागरा घातला आहे त्याचबरोबर तिने गळ्यामध्ये काळया मोत्यांचा नेकलेस देखील घातला आहे. तर रिंकू सिंग याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.
Rinku Singh just got engaged to a Member of Parliament of India, Priya Saroj! 💍
More about his fiance: She belongs to Samajwadi party, a competitor to the BJP, the ruling party.#RinkuSingh pic.twitter.com/PiwCpiEams
— Cricketangon (@cricketangon) June 8, 2025
आयपीएल 2025 च्या या सीजनमध्ये रिंकू सिंह हा कोलकत्ता नाईट रायडर्स कडून खेळला मागील वर्षाचा विजेता संघ या सीजन मध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. या सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या स्थानावर राहिला. कोलकत्ता च्या संघाने 14 सामने खेळले यामध्ये त्यांना फक्त पाच सामन्यात विजय मिळवता आला तर सात सामना त्यांचा पराभव झाला. रिंकू सिंग त्याचबरोबर इतर संघांमधील खेळाडू देखील या सीझनमध्ये काही विशेष कामगिरी करू शकले नाही आंद्रे रसेल हा पूर्णपणे फेल ठरला. कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार पद हे या वर्षी अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवण्यात आले होते.