शिखर धावण आणि युजवेंद्र चहल(फोटो-सोशल मिडिया)
Shikhar Dhawan’s performance with Yuzvendra Chahal : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवन ही दोघे चांगलेच चर्चेत आला आहेत. यांनी महाभारतातील एक सीन पुन्हा तयार केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या दरम्यान चहलने शिखर धवनला आपला पुतण्या बनवल्याचे दिसत आहे. चहल काही काळापासून भारतीय संघाबाहेर आहे.
शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनी एकत्र येऊन एक व्हिडिओ बनवला आहे. दोघांनी महाभारतातील एक आयकॉनिक सीन उभारला आहे. ज्यामध्ये चहल शकुनी मामाची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी शिखर धवन हा दुर्योधन बनला आहे. ज्याचा व्हिडिओ काही क्षणातच तूफान व्हायरल झाला आहे. लोकांना हा व्हिडिओ पसंतीस उतरला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : KL Rahul आणि Yashasvi Jaiswal ची जोडी नंबर-१, हेडिंग्ले कसोटीत रचला इतिहास; वाचा सविस्तर..
या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये कोणीतरी लिहिले आहे की,’युजवेंद्र चहल आणि शिखर धवन एका नवीन अवतारात दिसत आहेत.’ एका चाहत्याने म्हटले की,’आयपीएल थांबले आहे, रामायण सुरू झाले आहे.’ दुसऱ्याने कमेंट केली की ‘दोघेही वेगळ्या पद्धतीने सुरू आहेत.’ तसेच एका वापरकर्त्याने म्हटले की आहे की, ‘येणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटाची ही एक छोटी क्लिप.’ अशा मजेशीर कमेंट्स आल्या आहेत.
Shikhar Dhawan & Yuzvendra Chahal in a new avatar 👑#ShikharDhawan #Chahal pic.twitter.com/8TvF3iA1Ps
— Girish Chandra Pandey 🇮🇳 (@GirishC86267368) June 19, 2025
पंजाब किंग्जचा अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण १४ सामन्यांमध्ये २६.८७ च्या सरासरीने १६ विकेट्स पटकावल्या होत्या. विशेष म्हणजे या हंगामात चहलने हॅटट्रिक देखील घेतली आहे. ज्यामुळे त्याची कामगिरी अधिक खास ठरली आहे.
तथापि, आरसीबीने पंजाब किंग्जला अंतिम सामन्यात ६ धावांनी पराभूत केले होते. चहल सध्या भारतीय संघाबाहेर आहे, परंतु तो त्याच्या कामगिरीने राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असतो. त्याच वेळी, शिखर धवनने आयपीएल २०२४ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेट सोडल्यानंतर, धवन आता मनोरंजन जगात सक्रिय झाला आहे आणि अलीकडेच काही बॉलिवूड शो आणि संगीत व्हिडिओंमध्ये देखील तो दिसून आला आहे.