यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जात आहे.सामन्यापूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल भारताच्या डावाची सुरवात केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची मोठी भागीदारी रचली. या धावसंख्येवर केएल राहुल ४२ धावा काढून माघारी गेला. परंतु, तरी देखील दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियासाठी एक नवा पराक्रम केला आहे. आता हे दोन्ही खेळाडू हेडिंग्ले येथे असा पराक्रम करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले आहेत
भारतीय संघासाठी सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी हेडिंग्ले येथे एक विक्रम केला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजीचा नमूना पेश केला आहे. आता केएल आणि जयस्वाल हे हेडिंग्ले येथे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज बनले आहेत. या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भक्कम भागीदारी रचली. यापूर्वी, हेडिंग्लेच्या मैदानावर आजवर कोणत्याही भारतीय जोडीला पहिल्या विकेटसाठी इतक्या धावा करता आलेल्या नाही. त्याच वेळी, केएल राहुल आणि जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात हा मोठा पराक्रम करून दाखवला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शनकडून क्रिकेटप्रेमी खूप आशा लावून बसले होते.परंतु, तो लवकर बाद झाला. पदार्पणवीर साई सुदर्शन पहिल्या कसोटीत शून्य धावांवर बेन स्टोक्सचा शिकार ठरला. आयपीएल २०२५ मध्ये साई सुदर्शन सर्वाधिक ७५९ धावा करणारा फलंदाज ठरला होता.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.