शिवम दुबेने पूर्ण केल्या 1000 रन्स (फोटो- सोशल मीडिया)
आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज शिवम दुबेने टी 20 फॉर्मटमधील आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. कालच्या सामन्यात 9 रन्स करताच शिवम दुबे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा रेकॉर्ड करत त्याने संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. शिवम दुबेने सर्वात कमी बॉल्समध्ये 1000 रन्स पूर्ण केल्या आहेत.
सर्वात कमी बॉल्समध्ये टी 20 चे 1000 रन्स पूर्ण करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 648 बॉल्समध्ये शिवम दुबेने आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. शिवम दुबेचे टी 20 करियर चांगले राहिले आहे. त्याने 65 सामन्यांमध्ये 1016 रन्स केल्या आहेत. या फॉर्मटमध्ये तो अत्यंत वेगाने रन्स करतो. शिवम दुबे 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा हिस्सा राहिलेला आहे.
आयर्लंडने भारताला लोळवलं
भारत विरुद्ध आयर्लंड या दोन संघांमध्ये टी 20 सिरिजमधला पहिला सामना खेळवण्यात आला. आयर्लंडने भारताला प्रथम फलंदाजी करताना 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्माने शानदार सुरुवात केली. अखेर या पहिल्या टी 20 सामन्यात आयर्लंड संघाचा 34 रन्सने विजय झाला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर आणि भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.
कर्णधार Shreyas Iyer फ्लॉप! वैभव सूर्यवंशीला न घेणं पडलं महागात? आयर्लंडने भारताला लोळवलं
आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.






