आयर्लंडने केला भारताचा पराभव (फोटो- सोशल मीडिया)
भारताची फलंदाजी
आयर्लंडने भारताला 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली होती. मात्र संजू सॅमसन आजच्या सामन्यात साजेशी खेळी करू शकला नाही. तो केवळ 5 रन्स करून आउट झाला. तसेच त्यानंतर अफगणिस्तानविरुद्ध चांगली खेळी करणारा इशान किशन अपयशी ठरला. तो 1 रन करून आउट झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर खेळण्यासाठी आला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर प्रथमच फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. अभिषेक शर्मा 50 रन्सची खेळी करून आउट झाला. तर कर्णधार श्रेयस अय्यर 3 रन्सवर आउट झाला. तिलक वर्मा 19 रन्सवर आउट झाला. तर वॉशिंग्टन सुंदर 9 रन्स करून आउट झाला. शिवम दुबे 25 रन्स करून आउट झाला.
आयर्लंडची गोलंदाजी
आयर्लंडने पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करत भारताच्या महत्वाच्या 3 विकेट्स गमावल्या. मॅथ्यू हॉलार्डने श्रेयस अय्यर आणि इशान किशनची विकेट पटकावली. तर जय मुंद्राने संजू सॅमसनला आउट केले. आयर्लंडने शानदार गोलंदाजी केली. 10 ओव्हर्समध्ये भारताच्या 4 महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. मॅथ्यू हॉलार्डने तीन विकेट्स घेतल्या.
आयर्लंडची फलंदाजी
भारतीय संघाने प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर आयर्लंडकडून टिम टेक्टर आणि रॉस अडायर यांनी डावाची सुरुवात केली. मात्र त्यांना चांगली सुरुवात आयर्लंडला करून देता आली नाही. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 12 आणि 17 रन्स करून आउट झाले. त्यानंतर हॅरी टेक्टर खेळण्यासाठी आला. मात्र तो शून्यावर आउट झाला. त्यानंतर कर्णधार लॉर्कन टकर खेळण्यासाठी आला. बेंजामिन कॅलिट्झ 15 रन्स करून आउट झाला. कर्णधार लॉर्कन टकरने अर्धशतकी खेळी केली. जॉर्ज डॉकरेल 19 रन्स करून आउट झाला. गॅरेथ डेलानीने 49 रन्सची आक्रमक खेळी केली.
Abhishek Sharma doing what he does best 💥 The #TeamIndia opener cruises to a 1️⃣9️⃣-ball FIFTY 👊 Updates ▶️ https://t.co/gdoXw2dAKR#IREvIND | @OfficialAbhi04 pic.twitter.com/b2semHbeOh — BCCI (@BCCI) June 26, 2026
भारताची गोलंदाजी
भारताकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरुवात केली. दोन्ही गोलंदाजाण पॉवर प्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. दोघांना चांगला स्विंग मिळाल्याचे पाहायला मिळाले. हर्षित राणाने टिम टेक्टर आणि रॉस अडायरला आउट केले. तर अर्शदीप सिंगने हॅरी टेक्टरची विकेट पटकावली. तर शिवम दुबेने गोलंदाजी करत बेंजामिन कॅलिट्झला आउट केले. हर्षित राणाने एकूण 3 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेट घेतली.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.
चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?
आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.






