हेनरिक क्लासेन(फोटो-सोशल मिडिया)
Heinrich Klaasen Retirement : दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि स्फोटक खेळाडू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. क्लासेन म्हणाला की देशाचे प्रतिनिधित्व करणे हा त्याच्यासाठी सर्वात मोठा सन्मान राहील आहे आणि निवृत्तीचा निर्णय त्याच्यासाठी खूप कठीण असा होता. त्याने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ३,२४५ धावा केल्या आहेत.
हेनरिक क्लासेनने इंस्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर करत तो म्हणाला की, “देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नहेमीच अभिमानाची गोष्ट आहे, मी लहानपणापासूनच हे स्वप्न पाहत आलो होतो.” क्लासेनने असे देखील म्हटले आहे की या शानदार क्रिकेट कारकिर्दीत तो अशा लोकांना देखील भेटला, की ज्यांच्यासोबत त्याच्या आयुष्यात बदल झाला.
हेही वाचा : PBKS vs MI : पंजाब किंग्जची अंतिम फेरीत धडक अन् Preity Zinta ने आनंदाने मारल्या उड्या, पहा VIDEO
हेनरिक क्लासेनने निवृत्तीमागील कारण सांगताना म्हटले की, “मला आता आशा आहे की मी कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकेन कारण निवृत्तीनंतर मी ते करू शकणार आहे.” तसेच त्याने क्रिकेटमध्ये या टप्प्यावर पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे आभार देखील मानलेया आहे.
मागील वर्षी हेनरिक क्लासेनने जानेवारीमध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत फक्त ४ सामने खेळले आहेत ज्यामध्ये तो फक्त १०४ धावाच करू शकला होता. आता त्याने एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपांच्या क्रिकेटला राम राम ठोकला आहे. त्याच्या ६० एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ४ शतके आणि ११ अर्धशतकांसह २,१४१ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटने तीला खरी ओळख मिळवून दिली. या फॉरमॅटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी त्याची जगाने दाखल घेतली आहे. जिथे त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ५८ सामन्यांमध्ये १,००० धावा केल्या केल्या आहेत.
हेही वाचा : ENG vs WI : Joe Root एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास…
हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी शेवटचा टी २० सामना खेळला आहे. त्याच्या शेवटच्या सामन्यात त्याने केकेआरविरुद्ध नाबाद १०५ धावा केल्या होत्या. ते त्याचे वादळी शतक ठरले होते. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा सामना मार्च २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता.
आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामना काल पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले. श्रेयस अय्यरने षटकार खेचून सामना जिंकवला. पंजाब किंग्जने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.