मोठी बातमी ! भारताकडून नेपाळ सीमा सील; आयात-निर्यातही बंद, येत्या 2 ते 5 मार्चपर्यंत... (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
बहराईच : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच येत्या 5 मार्च रोजी नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तयारीही केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत-नेपाळ सीमा 2 मार्चच्या मध्यरात्रीपासून 5 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. नेपाळ गृह मंत्रालयाने या सीमा बंद करण्याबाबत अधिकृत पत्र जारी केले आहे.
नेपाळ सरकारच्या पत्रानुसार, मुक्त, निष्पक्ष, धाडसी आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया भारताच्या सीमेवरील संपूर्ण बांके जिल्ह्यातील सर्व सीमा चौक्या 2 मार्चच्या मध्यरात्री १२ ते ३ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंद राहतील. या काळात चौकीतून वस्तूंची आयात आणि निर्यात बंद राहील. मात्र, आवश्यक औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक थांबवली जाणार नाही. सशस्त्र सीमा दलाच्या 42 व्या बटालियनचे कमांडंट गंगा सिंह उदावत यांनी सांगितले की, नेपाळ प्रशासनाच्या पत्रानंतर, 2 मार्चच्या मध्यरात्रीपासून ५ मार्चच्या मतदानाच्या रात्रीपर्यंत सीमेवर प्रतिबंधित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मतदानापूर्वीचे सात दिवस आणि निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण नेपाळमध्ये दारूची विक्री, वाहतूक आणि सेवन करण्यास सक्त मनाई असेल. निवडणूक काळात होणारे वाद, हिंसाचार आणि मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयोगाने इशारा दिला आहे की, जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्थानिक दुकानांनाही या संदर्भात कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा यंत्रणांना समन्वय राखण्याच्या सूचना
निवडणूक प्रक्रियेत बाह्य शक्तींचा हस्तक्षेप होऊ नये आणि गुन्हेगारी कारवायांना चाप लागावा, यासाठी भारत-नेपाळ सीमा मतदानापूर्वी ७२ तास आधी सील केली जाईल. नेपाळमधील संबंधित जिल्हा दंडाधिकारी आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना (SSB) समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या काळात केवळ रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच सीमेवरून प्रवेश दिला जाईल. सामान्य लोकांसाठी सीमा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.
हेदेखील वाचा : Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL






