प्रीती झिंटा(फोटो-सोशल मिडिया)
PBKS vs MI : आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामना काल पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले. श्रेयस अय्यरने षटकार खेचून सामना जिंकवला. पंजाब किंग्जने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाने फ्रँचायझीची सह-मालक प्रीती आनंदाने तिच्या जागेवर उड्या मारताना दिसून आली.
पंजाब किंग्ज संघाने २०१४ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रेयस अय्यरने विजयी षटकार मारताच, प्रीती झिंटा आनंदाने तिच्या जागेवर उड्या मारायला सुरवात केली. संघ अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. अशी आनंदाचीसंधी प्रीती झिंटाच्या आयुष्यात १० वर्षांनी आली. झिंटाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयपीएल ऑन एक्सने शेअर केला आहे. त्यानंतर तिची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होऊ लागली.
हेही वाचा : ENG vs WI : Joe Root एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास…
अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयासह, अय्यरने एक खास कामगिरी केली आहे. तो तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेणारा जगातील पहिला कर्णधार बनला आणि दोन वेगवेगळ्या संघांसह सलग आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार देखील बनला आहे. अय्यरने नेहल वधेरा (४८ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. तर मार्कस स्टोइनिस (२ धावा) सोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद ३८ धावा जोडल्या. यासोबत २०१४ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाचा संस्मरणीय विजय झाला.
A DO𝗠𝗜NATING WIN! ❤️
Sarpanch @ShreyasIyer15 fires #PBKS into the #IPLFinal with an astonishing finish! 👏🏻🙌🏻
Watch #IPLFinals 👉 #RCBvPBKS | TUE, 3rd June, 5 PM on Star Sports Network & JioHotstar#ShreyasIyer pic.twitter.com/NKXXpkG2S8
— Star Sports (@StarSportsIndia) June 1, 2025
आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या नॉकआउट सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धचा विजय हा आयपीएलमध्ये अय्यरचा कर्णधार म्हणून ५० वा विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून अय्यरपेक्षा फक्त एमएस धोनी, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनीच आयपीएलचे सामने जिंकले आहेत.
हेही वाचा : कोण होणार BCCI चे नवे अध्यक्ष? रॉजर बिन्नी निवृत्त होणार
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात आयपीएलला एक नवीन विजेता मिळणार आहे. पीबीकेएस आणि आरसीबी दोघांनीही २००८ मध्ये लीग सुरू झाल्यापासून प्रत्येक आयपीएल हंगामात भाग घेतला असून त्यांना अद्याप एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.