कुसल मेंडिसचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आशिया कप २०२५ चा सुपर ४ टप्पा सुरू झाला आहे. पहिला सुपर ४ सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिसने एक खास विक्रम केला. मेंडिस आता टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे आणि त्याने कुसल परेराचा विक्रम मोडला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात कुसल मेंडिसने २५ चेंडूत ३४ धावा केल्या. यासह त्याने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून कुसल परेराला मागे टाकले. मेंडिसने या फॉरमॅटमध्ये २१९८ धावा केल्या आहेत, तर परेराने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१९२ धावा केल्या आहेत. पथुम निस्सांका टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०९६ धावांसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तिलकरत्ने दिलशान या यादीत चौथ्या स्थानावर आहे, त्याने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८८९ धावा केल्या आहेत. मेंडिसने ही कामगिरी करत पुन्हा एकदा श्रीलंकेच्या टीमचे नाव वर आणले आहे.
श्रीलंकेचा टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
कुसल मेंडिसने रोहित शर्माला मागे टाकले
कुसल मेंडिसने टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून रोहित शर्माला मागे टाकले आहे. मेंडिसने १० सामन्यांमध्ये १० डावांमध्ये २७७ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ९ सामन्यांमध्ये ९ डावांमध्ये २७१ धावा केल्या आहेत. या सामन्यात मेंडिसने २९ धावा करून रोहित शर्माला मागे टाकले आहे. टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने १० सामन्यांमध्ये ४२९ धावा केल्या आहेत.
SL Vs BAN Aisa Cup 2025: श्रीलंकेसमोर तगड्या बांग्लादेशचे आव्हान; सुपर 4 मध्ये कोण मारणार बाजी?
श्रीलंकेने बांगलादेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० आशिया कप सामन्यात, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात श्रीलंकेकडून दासुन शनाकाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३७ चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. त्यानंतर कुसल मेंडिसने ३४, निसांका २२ आणि चरिथ असलंका यांनी २१ धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमानने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेतले.