फोटो सौजन्य – Bangladesh Cricket
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे यामध्ये या मालिकेचा पहिला सामना पार पडला. दोन्ही संघांनी सामन्यांमध्ये चांगले कामगिरी केली. बांगलादेशच्या संघाने पहिले नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने पहिले फलंदाजी करत पहिल्या गावामध्ये 495 धावा केल्या होत्या तर दुसरा डावामध्ये श्रीलंकेच्या संघाने 485 धावा केल्या. तिसऱ्या डावात बांग्लादेश संघाने 285 धावा करून डाव घोषित करण्यात आला. त्याच्याकडची उत्तरात श्रीलंकेच्या संघाने चार विकेट्स कमावून दहाच्या धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा हा पहिला सामना पूर्ण झाला आहे आणि त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलचे खाते उघडले आहे. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी ४ गुण विभागले गेले आहेत. SL विरुद्ध BAN हा पहिला कसोटी सामना गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. १२ वर्षांनंतर या मैदानावर एक सामना अनिर्णित राहिला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या मैदानावर शेवटचा श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धही अनिर्णित सामना खेळला होता. त्यानंतर येथे २६ सामने खेळले गेले आहेत ज्यात प्रत्येक सामना निकालात संपला आहे. या सामन्यानंतर श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
ENG vs IND : 13000 धावा, 36 शतके… जसप्रीत बुमराहने फेरलं या दिग्गांजाच्या आकड्यांवर पाणी
गॉल कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेशचे प्रत्येकी ४ गुण आहेत. त्यांचा विजयाचा टक्का ३३.३३० आहे. मालिकेतील दुसरा सामना २५ जूनपासून कोलंबो येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकण्याबरोबरच मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतील. जेव्हा श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरी कसोटी सुरू होईल, तेव्हा भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीचा निकालही जाहीर होईल, आशा आहे की ती कसोटी अनिर्णित राहणार नाही.
Najmul Hossain Shanto becomes the first Bangladesh captain to score centuries in both innings of a Test match! 💯💯
The 1st Test match between Sri Lanka and Bangladesh ended in a draw.#SLvsBAN #NajmulHossainShanto #AngeloMatthews #CricTracker pic.twitter.com/5X0hRch1lx
— CricTracker (@Cricketracker) June 21, 2025
बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने पहिल्याच सामन्यात दोन शतक नावावर केले आहेत. बांग्लादेशच्या पहिल्या इनिगमध्ये त्याने 148 धावांची खेळी खेळली होती तर दुसऱ्या डावामध्ये 125 धावा केल्या होत्या त्याच्या या खेळीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. नजमुल हुसेन शांतो हा बांग्लादेशचा पहिला खेळाडु ठरला आहे ज्याने बांग्लादेशसाठी दोन्ही डावामध्ये शतक झळकावले आहे.