वेस्ट विंडीज कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज शमार जोसेफ आणि अल्झारी जोसेफ हे दुखापतींमुळे मालिकेत सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ८५ कसोटींचा अनुभव असलेला रोच हा आक्रमणाचा नेतृत्वकर्ता असेल. दरम्यान, २९ वर्षीय वेगवान गोलंदाज ओजाई शिल्ड्ला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. शिल्ड्ने अलीकडेच अँटिग्वा येथे झालेल्या उच्च-कार्यक्षमता शिबिरात प्रभावी कामगिरी केली होती. तसेच अष्टपैलू कावेम हॉग याचीही संघात वापसी झाली असून डावखुरा फिरकीपटू खारी पियरे याला वगळण्यात आले आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजचे संचालक माइल्स बास्कोम्बे यांनी न्यूझीलंडची आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन शिबिराचे आयोजन केले होते.
हेही वाचा : Ashes 2025: मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास! WTC मध्ये ‘हा’ कारनामा करत बनला जगातील तिसराच गोलंदाज
वेस्ट इंडिजचा संघ २० नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल होईल आणि स्थानिक एकादशविरुद्ध दोन दिवसांचा सराव सामना खेळेल. ही मालिका चालू डब्ल्यूटीसी चक्राचा भाग असून वेस्ट इंडिज पाचही सामने गमावल्यामुळे तळाशी आहे. न्यूझीलंड या मालिकेद्वारे आपली डब्ल्यूटी मोहिम सुरू करणार आहे.
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, तेजानरिन चांदीपॉल, जस्टिन ग्रेव्हज, कावेम हॉग, शाई होप, तावेन इमलाच, ब्रँडन किंग, जोहान लिन, अँडरसन फिलिप, केमार रोच, जेडेन सील्स, ओजाई शिल्ड्
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामाना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या शतकाने ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८ विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मिचेल स्टार्कचे १० विकेट्स आणि ट्रॅव्हिस हेडचं विक्रमी शतक व लबुशेनचं अर्धशतकाच्या जोरवार इंग्लंडवर सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.






