Sourav Ganguly on Kolkata Rape Murder Case : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणी देशभरात निदर्शने सुरू आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, “आम्ही किमान 30 संशयितांची ओळख पटवली आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.”
काय म्हणाला सौरव गांगुली
“It was just a stray incident.”
~ says Sourav Ganguly about #KolkataDoctor gangrape and murder.
I used to be a huge fan of this man. pic.twitter.com/w8N9zhrqSb — Abhijit Majumder (@abhijitmajumder) August 17, 2024
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीकडून घटनेचा तीव्र निषेध
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या घटनेचा निषेध करत ही शिक्षा कठोर असायला हवी असे म्हटले आहे. या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वी केलेल्या एका विधानावरही स्पष्टीकरण दिले. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यापूर्वी गांगुलीने याला ‘एकदा घडलेली घटना’ असे म्हटले होते. गांगुलीने या घटनेची तीव्र शब्दात निंदा करीत, पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी तडजोड करायला सांगितली.
शिक्षा अशी असावी, पुन्हा आयुष्यात असा गुन्हा करण्याचे धाडस….
सौरव गांगुली पत्रकारांना म्हणाला, ‘मी हे गेल्या रविवारी बोललो, त्याचा अर्थ किंवा स्पष्टीकरण कसे झाले ते मला माहीत नाही. मी आधी सांगितले आहे, ही एक भयानक गोष्ट आहे. आता सीबीआय आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे घडले ते अतिशय लज्जास्पद आहे. मला आशा आहे की या प्रकरणाचा तपास करत असलेली सीबीआय दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा देईल. शिक्षा अशी असावी की आयुष्यात पुन्हा असा गुन्हा करण्याचे धाडस कोणी करू नये. ही शिक्षा कठोर असावी.
देशव्यापी संपाची हाक
कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या घटनेवर वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशव्यापी संपाची हाक दिली आहे ज्या दरम्यान नियमित OPD सेवा आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. तथापि, सर्व आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
आयएमएने निवासी डॉक्टरांसाठी विशेष मागणी केली
IMA, भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना, निवासी डॉक्टरांच्या कामाच्या आणि राहणीमानात बदल करण्याची मागणी केली आहे, ज्यात 36 तासांच्या शिफ्ट आणि विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाणांचा समावेश आहे. कामाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध होणारा हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायद्याची मागणी केली आहे.