‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ (फोटो- सोशल मिडिया)
‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
किरण ॲकॅडमी, सिएनए संघांची विजयी कामगिरी
टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू आहे स्पर्धा
पुणे/Cricket News: स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत किरण क्रिकेट (Sports) ॲकॅडमी आणि क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पर्श सावंत याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर किरण क्रिकेट ॲकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकट क्लबचा १६ धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या किरण क्रिकेट ॲकॅडमीने २५ षटकात ११८ धावा धावफलकावर लावल्या. अरहान पानसरे (२२ धावा) आणि रूद्र भोसले (२२ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पेशलाईज्ड क्रिकट क्लबचा डाव १०२ धावांवर संपुष्टात आला. शुभम वाडेकर याने ३३ धावांची खेळी करून एकहाती लढा दिला. इशान हब्बु याने दोन गडी बाद केले तर, स्पर्श सावंत आणि तिनेश चौधरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून किरण ॲकॅडमीचा विजय साध्य केला.
Pune Cricket: स्पार्टन मान्सून लीग T-20: लेजंड्स स्पोर्ट्स क्लब अन् कल्याण क्लबची विजयी मालिका सुरूच
ओजस वाईकर याने अचूक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीचा १७ धावांनी विजय मिळवून पहिल्या विजयासह गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने २७.२ षटकात १२७ धावांचे लक्ष्य उभे केले. अमेय डेंबारे (३७ धावा) आणि रचित पाटील (२३ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. स्पार्क संघाच्या श्रेयश थोरात आणि समर रेवाळे यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ११० धावांवर आटोपला. प्रणव कुलकर्णी (२३ धावा), हित कारीया (१७ धावा) आणि साई जवळकर (१७ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. ओजस वाईकर आणि विवान देशमुख यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केली. रोहन यादव याने दोन गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला.
किरण क्रिकेट ॲकॅडमी : २५ षटकात ७ गडी बाद ११८ धावा (अरहान पानसरे २२, रूद्र भोसले २२, काव्य जंगम १६, स्टीफन शिरोडकर १-६, अन्वय थाओकर १-१६) वि. वि. स्पेशलाईज्ड क्रिकट क्लब : २३.५ षटकात १० गडी बाद १०२ धावा (शुभम वाडेकर ३३, इशान हब्बु २-१३, स्पर्श सावंत १-१८, तिनेश चौधरी १-१८); सामनावीर : स्पर्श सावंत
Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी : २७.२ षटकात १० गडी बाद १२७ धावा (अमेय डेंबारे ३७, रचित पाटील २३, श्रेयश थोरात ४-१५, समर रेवाळे ४-१९) वि. वि. स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट ॲकॅडमी : २८.२ षटकात १० गडी बाद ११० धावा (प्रणव कुलकर्णी २३, हित कारीया १७, साई जवळकर १७, ओजस वाईकर ३-७, विवान देशमुख ३-१२, रोहन यादव २-१६); सामनावीर : ओजस वाईकर.






