Spartan Monsoon League (फोटो- सोशल मिडिया)
लेजंड्स स्पोर्ट्स क्लबचे सलग विजय
लेजंड्सचा टायटन बुल्सवर ५७ धावांनी विजय
कल्याण क्लबची ब्रेव्हहार्टवर ५ गडी राखून मात
पुणे/Pune Cricket: स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे यांच्या वतीने आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत लेजंड्स स्पोर्ट्स क्लब आणि कल्याण क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत विजयी मालिका कायम ठेवली. सिंहगड रोडवरील कोद्रे फार्म्स क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी करत आगेकूच केली. अजिंक्य जैनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने (Cricket) टायटन बुल्सचा ५७ धावांनी सहज पराभव केला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने १८ षटकांत २१६ धावांचा डोंगर उभा केला. संकेत जोशीने ६८ धावांची दमदार खेळी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्याला अजिंक्य जैनने २४ धावा, अच्युत मराठेने २४ धावा, समीर पंचपोरने २९ धावा आणि शंतनु आठवलेने २७ धावा करत चांगली साथ दिली.
२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टायटन बुल्सचा डाव १५९ धावांवर आटोपला. संतोषकुमार सांगळेने ७० धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेजंड्सच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत त्यांचा डाव रोखला. अष्टपैलू अजिंक्य जैनने ४५ धावांत ३ गडी बाद करत गोलंदाजीतही आपली छाप पाडली. केतन पासलकरने २ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. अखेर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने ५७ धावांनी विजय मिळवला.
Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
दुसऱ्या सामन्यात राकेश माळीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कल्याण क्लबने ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह कल्याण क्लबने स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवला.प्रथम फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले. नेल्सन एरीकने ४७ धावा, अभिषेक परांगेने ३२ धावा आणि नीरज शर्माने ३९ धावा करत संघाची धावसंख्या वाढवली.कल्याण क्लबकडून राकेश माळीने ३३ धावांत ३ गडी बाद करत प्रभावी गोलंदाजी केली.
लट्ठ गाड़ दिया! Haryana च्या वाघिणींनी पुणे हादरवले; हॉकी इंडिया स्पर्धेत झारखंडला लोळवले
आकाश शहाने २ गडी बाद करत त्याला साथ दिली.विजयासाठी आवश्यक १९२ धावांचे लक्ष्य कल्याण क्लबने १९.१ षटकांत ५ गडी गमावून पूर्ण केले. फलंदाजीत जितेंद्र राऊतने ४३ धावा, रोहित गुगळेने ३५ धावा, मयुर गटाळेने ३३ धावा, चिराग शेरकरने नाबाद ३१ धावा आणि मिहीर रिसबुडने २२ धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.चिराग शेरकरने अखेरपर्यंत संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.






