दुबई : रविवारी आशिया कप २०२२ ( Asia Cup) स्पर्धेतील अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Shri lanka Vs Paksitan) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला असून यजमान श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल आहे. श्रीलंकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला असून आशिया कपच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम लढतीत श्रीलंका आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते.
अंतिम सामन्याची नाणेफेक पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. श्रीलंकेच्या संघानं २० षटकात ६ विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर १७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण राजपक्षे आणि हसरंगा यांच्यातील सहाव्या विकेटसाठी केलेली भागीदारी आणि त्यानंतर सातव्या विकेटसाठी चमिका करुणारत्नेसोबतची अर्धशतकी भागीदारी यामुळे श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यश आलं. श्रीलंकेच्या संघानं पॉवर प्लेच्या आत तीन विकेट्स गमावले. श्रीलंकेचा निम्मा संघ १० षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. कुसल मेंडिस खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. निसांका आणि सिल्वा यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७ धावांची २१ धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेच्या संघानं दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या चषकात कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांच्यात रुपात संघाला दोन मोठे धक्के बसले.मात्र, त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण इफ्तिखार ३१ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. मोहम्मद नवाजही स्वस्तात माघारी परतला. पाकिस्तानच्या डावातील १७ व्या षटकात हसरंगानं तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. अखेर पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रमोद मादुशाननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, वानिंदु हसरंगाला तीन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, चचमिका करुणारत्नेनं दोन आणि महेश तीक्ष्णानं एक विकेट्स घेतली.