भारताच्या वाघिणींनी पाकिस्तानला नमवलं! (Photo Credit- X)
पाकिस्तानी महिला अ संघाला ९३ धावांत गुंडाळल्यानंतर, सर्वांच्या नजरा भारतीय महिला अ संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर होत्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी हुमैरा काझी ही पहिली विकेट शून्यावर गमावली. अनुष्का शर्माने वृंदा दिनेशसोबत मिळून डाव स्थिरावलाच नाही तर वेगाने धावाही केल्या. पहिल्या सहा षटकांच्या अखेरीस टीम इंडियाने एका विकेटच्या मोबदल्यात ६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर अनुष्का शर्मा २६ चेंडूत २४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता.
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐚𝐫𝐞 𝐛𝐚𝐜𝐤 𝐨𝐧 𝐭𝐫𝐚𝐜𝐤 𝐰𝐢𝐭𝐡 𝐚 𝐜𝐨𝐦𝐦𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 𝐰𝐢𝐧 𝐨𝐯𝐞𝐫 𝐏𝐚𝐤𝐢𝐬𝐭𝐚𝐧🤩 The bowling unit fired in unison to set the tone and the top order made no mistakes in the second half 🇮🇳#DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 #INDWvPAKW #ACC pic.twitter.com/FbflqmQgcL — AsianCricketCouncil (@ACCMedia1) February 15, 2026
हे देखील वाचा: IND vs PAK सामना पाहायचा आहे? एकही रूपया खर्च करण्याची गरज नाही! येथे घ्या फ्री सामन्याचा आनंद, वाचा संपूर्ण तपशील
वृंदा आणि अनुष्काने पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी केली. अनुष्काच्या जाण्यानंतर तेजल हसबनीस फलंदाजीला आली आणि वृंदासोबत मिळून तिने संघाला शानदार विजय मिळवून दिला. वृंदाने २९ चेंडूत १२ चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. तेजल हसबनीस यांनी ५ चेंडूत नाबाद १२ धावा केल्या.
भारतीय संघाच्या गोलंदाजी कामगिरीत कर्णधार राधा यादव, प्रेमा रावत आणि साईमा ठाकोर या उत्कृष्ट होत्या. पाकिस्तानी महिला अ संघाच्या फलंदाज या गोलंदाजांसमोर खूपच असहाय्य होत्या. कर्णधार राधा यादवने तिच्या तीन षटकात फक्त ११ धावा देत तीन विकेट घेतल्या. प्रेमा रावतने तिच्या तीन षटकांत १६ धावा देत दोन बळी घेतले, तर साईमा ठाकोरने तिच्या चार षटकांत १४ धावा देत दोन बळी घेतले. जिंतीमणी कलिता आणि मिनू मणी यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. या सामन्यात पाकिस्तानच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
हे देखील वाचा: NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत






