मुंबई : अर्जुन तेंडुलकरने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. तब्बल दोन वर्षे वाट पाहिल्यावर अर्जुनला अखेर आज संधी मिळाली. पण हा सामना सुरु असताना एक अजब योगायोग पाहायला मिळाला. हा योगायोग घडला तो पिता आणि पूत्र सचिन व अर्जुन यांच्यामध्ये.
सचिन-अर्जुनचे आयपीएलमधील पहिले षटक :
अर्जुनला आज केकेआरविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली. त्यानंतर अर्जुनला यावेळी पहिले षटक टाकण्यातही देण्यात आले. या सर्व गोष्टींमध्ये एक अजब योगायोग असल्याचे आता समोर आले आहे. आतापर्यंत असा योगायोग आयपीएल तर सोडाच पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळालेला नाही.
महान सचिनची आयपीएलमधील गोलंदाजी :
देशाचा महान फलंदाज सचिनने आयपीएलमधील आपले पहिले षटक हे एप्रिल २००९ मध्ये टाकले होते. अर्जुनने आपले पहिले षटक एप्रिल २०२३ मध्ये टाकले. या दोघांनीही आपले आयपीएलमधील पहिले षटक हे केकेआर या संघाविरुद्धच टाकल्याचे आता समोर आले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट तर त्याच्या पुढे आहे. या दोघांनी आपल्या पहिल्या षटकात सारख्याच धावा दिल्याचेही आता समोर आले आहे.
What a coincidence 😲#Arjuntendulkar #Sachintendulkar#MIvsKKR #IPL2023 #CricketTwitter pic.twitter.com/qXK4vjPGDu
— Akash Sharma (@uncutnazaare) April 16, 2023
सचिन आणि अर्जुनने दिल्या समान धावा :
सचिनने २००९ साली जेव्हा केकेआरविरुद्ध पहिले षटक टाकले तेव्हा त्याने पाच धावा दिल्या होत्या. अर्जुनने आपले पहिले षटक जेव्हा टाकले तेव्हा त्यानेही चक्क पाचच धावा दिल्या होत्या. त्यामुळे सचिन आणि अर्जुन यांच्यांमध्ये हा असा अजब योगायोग असल्याचे पाहायला मिळाले आहे.