तेंडुलकर कुटुंबात सनईचौघडे! अर्जुनच्या लग्नासाठी सचिनने घेतली पंतप्रधान मोदीं-शांहची भेट; दिलं निमंत्रण (photo Credit - X)
सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि कुटुंबातील सदस्यांनी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सचिनने अर्जुन आणि त्याची भावी पत्नी सानिया चांडोक यांच्या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधानांना दिले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सचिनने लिहिले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभासाठी आमंत्रित करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. या तरुण जोडप्याला दिलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शनाबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक आभार.”
We were honoured to invite Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you, Modi ji, for your blessings and thoughtful advice for the young couple. pic.twitter.com/7oxOZm3i5X — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2026
We cordially invited Hon’ble Home Minister Shri @AmitShah ji to Arjun and Saaniya’s wedding. Thank you for the warmth extended to our family, we deeply appreciate your kind wishes. pic.twitter.com/IfcNIms6qK — Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2026
Sania Chandok Photos : अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? जाणून घ्या माहिती..
केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे, तर सचिनने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही १०, जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अंजली तेंडुलकरही सोबत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिनने सोनिया गांधींनाही लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये लग्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना उपस्थित राहून एक गुप्त साखरपुडा समारंभ पार पडला. वृत्तांनुसार, अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात, ३ मार्च रोजी विधी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि लग्न समारंभ ५ मार्च २०२६ रोजी होण्याची अपेक्षा आहे. हे समारंभ मुंबईत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात, स्वतः सचिन तेंडुलकरने अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
अर्जुन तेंडुलकरसोबत साखरपुडा झालेली सानिया चांडोक ही मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात आहे. या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम कंपनी आहे. अर्जुनची भावी पत्नी असणारी सानिया चांडोक याआधी देखील अनेकदा अर्जुन आणि त्याची बहीण सारा तेंडुलकरसोबत दिसूनआलिया आहे. सानियाला WVS कडून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तिने त्यांचा ABC कार्यक्रम पूर्ण केला असून ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक असल्याची माहिती मिळत आहे. सानिया फारशी सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहत नाही. तिच्या साखरपुड्याची बातमी व्हायरल होताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






