Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?

England Beat India Won T-20 Series: महिला टी-२० विश्वचषकाच्या आधी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताला सहा गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 02:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची वाढली चिंता
  • इंग्लंडकडून मालिका पराभव
  • विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?
महिला T- २० विश्वचषक 2026 पूर्वी भारताच्या महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टाँटन येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक T- २० सामन्यात इंग्लंडने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात, इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत १८१ धावांचे लक्ष्य सहज पार करत सामना जिंकला. विश्वचषकाला अवघे काही दिवस उरले असताना टीम इंडियाचा हा पराभव संघाची चिंता वाढवणारा आहे. यामुळे विश्वचषकासाठी भारतीय संघ किती सज्ज आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

IND vs AFG: अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCIचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मराठमोळ्या दिग्गजाची एन्ट्री

इंग्लंडचा दमदार कमबॅक

१८१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या तीन ओव्हरमध्ये डॅनी वायट-हॉज आणि सोफिया डंकली बाद झाल्या. त्यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या ओवहेहरमध्ये एमी जोन्स बाद झाली, त्यामुळे संघाने अवघ्या ३५ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, एलीस कॅप्सीने आणि हीथर नाइटने यांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करत सामना भारताच्या हातातून काढून घेतला. अॅलिस कॅप्सीने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिने २६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, हेदर नाईटनेही महत्वपूर्ण खेळी खेळत ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी फिरकी आणि वेगवान गोलंदाजीविरुद्ध अथक आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे इंग्लंडने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि संघाला विजय मिळवून दिला.

भारताचा निराशाजनक पराभव

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. शफाली वर्मा ११ धावांवर बाद झाली, तर स्मृती मंधाना चार्ली डीनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू (LBW) झाली. त्यानंतर यास्तिका भाटियाने वेगवान खेळी करून भारताची सूत्रे हाती घेतली. तिने पॉवरप्लेमध्ये ७ चौकार मारून धावगती कायम ठेवली, पण ३२ धावांवर धावबाद झाली. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. लॉरेन बेलच्या स्लोअर बॉलवर बोल्ड झाल्यामुळे जेमिमाला आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. हरमनप्रीतने एक बाजू सांभाळत नाबाद ५६ धावा केल्या. मात्र, भारतीय संघ शेवटच्या पाच ओव्हरमध्ये केवळ ४८ धावाच जोडू शकला, ज्याचा अंतिम धावसंख्येवर स्पष्ट परिणाम झाला. भारताने आपल्या निर्धारित २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या.

विश्वचषकापूर्वी भारताची चिंता वाढली

१२ जूनपासून सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण होती. भारताने संपूर्ण मालिकेत चांगला क्रिकेट खेळला, पण निर्णायक सामन्यात दबावाखाली इंग्लंडने उत्तम कामगिरी करत मालिका जिंकली. त्यामुले विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

IND vs AFG: रोहित – हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह, अफगाणिस्ताविरूद्ध खेळणार नाही RO-KO?

Web Title: Ind w vs eng w india concerns grow after series defeat ahead of womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • indian cricket team

संबंधित बातम्या

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार
1

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?
2

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
3

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
4

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.