ईशान किशन(फोटो-सोशल मीडिया)
Ishan Kishan’s father’s revelation : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज इशान किशनचा दोन वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. इशान किशन २०२३ च्या अखेरीस संघातून डच्चू देण्यात आला होता. आता मात्र त्याला २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान दिले गेले आहे. इशान किशनची विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड खुश आहेत. दरम्यान, इशान किशनचे वडील प्रणव पांडे यांनी स्पष्ट केले की इशान भारतीय संघापासून दूर असताना त्याने त्याच्या खेळावर आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली. तसेच यावेळी त्यांनी इशानच्या लग्नाबद्दलही त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाने संपवली ‘बेजबॉल’ची कहाणी, अॅशेस मालिका जिंकून 10 वर्षांचा दबदबा ठेवला कायम
एका मीडिया एजन्सीशी बोलताना, इशानचे वडील प्रणव पांडे यांनी सांगितले की, झारखंड आणि बिहारच्या लोकांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा इशान संघात सामील नव्हता तेव्हा लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा आणि प्रेम देखील दिले. याबद्दल आम्ही त्याच्या चाहत्यांचे आभार यांनात आहोत. लोकांनी त्याच्यावर खूप विश्वास राखला, टी-२० विश्वचषक संघात त्याला संधी मिळाल्यानंतर आम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून खूप अभिनंदनाचे संदेश मिळत आहेत. क्रिकेटबाबतअंदाज लावता येत नसला तरी, तो विश्वचषकात चमकदार कामगिरी करेल आणि विजेतेपद जिंकेल अशी आमची आशा आहे.”
हेही वाचा : शेवटच्या क्षणी शुभमन गिलसोबत असे काय घडले? का वगळण्यात आले संघातून…जाणून घ्या संपूर्ण कहाणी
त्याच्या वडिलांनी हे देखील सांगितले की टीम इंडियामधून वगळल्यानंतर, इशानने त्याच्या खेळावर आणि फिटनेसवर अधिक कठोर परिश्रम केले आहेत. ते म्हणाले की, “माझ्या मुलाने स्वतःवर खूप मेहनत घेतली असून त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे आणि खूप प्रयत्न केले आहेत. जर इशान सातत्याने चांगली कामगिरी करत राहिला तर त्याला निश्चितच संघामध्ये संधी मिळेल असा आमचा विश्वास आहे.”
२७ वर्षीय इशान किशनच्या लग्नाबद्दल, त्याच्या वडिलांनी एक खुलासा केला. त्यांनी सांगितले की तो अजून लहान आहे आणि त्याच्या वेळेनुसार लग्न करेल. सध्या, त्याचा खेळ सुधारण्याची हीच योग्य वेळ असून त्याला लग्नात बांधून आम्ही त्याच्यावर अतिरिक्त दबाव आणू इच्छित नाही. सध्या त्याचे लक्ष विश्वचषकावर आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इशानने १० डावात ५१७ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके देखील त्याने झळकवली आहेत. इशानच्या सातत्यपूर्ण कामगिरीने त्याला टी-२० विश्वचषकात स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने झारखंडला पहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली आहे.






