Mahindra Bolero साठी आता मोजावे लागणार जास्त पैसे! कंपनीने केली नव्या किंमतीची घोषणा, या कारणामुळे घेतला निर्णय
Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
4-मीटरहून छोट्या कार्स आणि त्यापेक्षा थोड्या मोठ्या सेगमेंटमध्ये महिंद्रा एकमेव अशी कंपनी आहे जी, पारंपरिक बॉडी-ऑन-फ्रेम वाहनांचे उत्पादन करते. बोलेरो गाड्या विशेषत: भारतातील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी डिझाईन केल्या जातात. या गाड्यांमध्ये एक साधे इंजिन आणि मजबुतीवर भर देणारी एक साधी केबिन आहे. कंपनीने बदललेल्या किंमतींची घोषणा केल्यानंतर आता जे ग्राहक गाडीचे मिड रेंज व्हेरिअंट खरेदी करतील, त्यांना वाढलेल्या किमतींचा सर्वाधिक फटका बसेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
महिंद्रा बोलेरो क्लासिक B4, B6, B6 (O) आणि B8 या चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. B4 व्हेरिअंटच्या किंमतीत केवळ 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत आज देखील 7.99 लाख रुपये आहे. तर B6 व्हेरिअंटच्या किंमतीत तब्बल 25,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर B6 (O) व्हेरिअंटच्या किंमतीत 26,500 रुपयांची आणि B8 व्हेरिअंटच्या किंमतीत 21,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता या व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 9.90 लाख रुपये झाली आहे. या सर्व मॉडेल्समध्ये आधीप्रमाणेच 1.5 लीटर mHAWK 75 डिझेल इंजिन मिळते, ज्यामध्ये 5-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स देण्यात आला आहे.
महिंद्रा बोलेरो निओ N4, N8, N10 (R), N11 आणि N10 (O) या पाच व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या बेस मॉडेल N4 च्या किंमतीत सर्वाधिक 15,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर N8 मॉडेलच्या किंमतीत 5,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 8.84 लाख रुपये झाली आहे.
बोलेरो निओ प्लस P4 आण P10 या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस मॉडेल (P4) च्या किंमताीत 9,500 रुपयांची वाढ झाली आहे. तर P10 व्हेरिअंटची किंमत 4,500 रुपयांनी वाढली आहे. या 7-सीटर गाडीची एक्स-शोरूम किंमत 10.99 लाख रुपये ते 11.99 लाख रुपयांदरम्यान आहे. निओ प्लसमध्ये स्कॉर्पिओ क्लासिकप्रमाणेच 2.2-लिटरचे डिझेल इंजिन आहे.






